Jayant Naralikar : मनुष्य पृथ्वीऐवजी दुसऱ्या ग्रहावर स्थायिक होऊ शकतो का? जयंत नारळीकरांच्या उत्तराने जिंकलेली लाखो मने

Jayant Naralikar life on different planet : जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक डॉ. जयंत नारळीकर यांचे वयाच्या 86व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
Jayant naralikar answer life on different planet
Jayant naralikar answer life on different planetesakal
Updated on

Jayant Naralikar Story : जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक डॉ. जयंत नारळीकर यांचे वयाच्या 86व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या वैज्ञानिक आणि साहित्यिक योगदानाने विश्वाला नवी दिशा दिली. त्यांच्याबद्दलचा एक किस्सा खूप फेमस आहे

पृथ्वीवरची जागा अपुरी पडत असून माणूस आता इतर ग्रहांवर आपली वस्ती वसवण्याची स्वप्नं बघत आहे. अगदी चंद्रावर जमीन खरेदी करण्यापर्यंत माणसाची मजल गेली आहे. पण खरंच पृथ्वी सोडून इतर ग्रहांवर स्थायिक होणे शक्य आहे का ? या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी एक कार्यक्रमात दिले होते.

Jayant naralikar answer life on different planet
Jayant Naralikar : नारळीकरांनी स्टीफन हॉकिंगला हरवलं तो दिवस..! सर्वाधिक प्रश्न विचारणारा विद्यार्थी अन् केम्ब्रिजच्या आठवणी

सजीवांना जगण्यासाठी पृथ्वीसारखे वातावरण आणि संसाधने दुसऱ्या ग्रहावर मिळणे सध्या तरी अवघड आहे. त्यामुळे पृथ्वीला सहज सोडणे सोपे जाणार नाही. आपण मंगळावर गेलो तरी श्वासातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईडचे ऑक्सिजनमध्ये कोण रूपांतर करणार, असा प्रश्न नारळीकर यांनी उपस्थित केला होता.

सध्या तरी मानवी वस्तीसाठी पृथ्वीइतका योग्य दुसरा ग्रह नाही. जर तुमचे काही आर्थिक हितसंबंध असतील किंवा काही संसाधने मिळवायची असतील तर दुसऱ्या ग्रहावर वस्ती करण्यास जाऊ शकतो, असे डॉ. जयंत नारळीकर यांनी सांगितले होते.

निदान पुढील शंभर वर्षे तरी माणसाला पृथ्वी सोडून दुसरीकडे वस्ती करण्यासाठी जाणे शक्य नाही. त्यामुळे पृथ्वीशीच मैत्रीपूर्ण संबंध ठेवत, तिचेच संवर्धन करणे गरजेचे आहे, असा सल्ला डॉ. मंगला नारळीकर यांनी दिला होता.

उच्च प्राथमिक वर्षापासूनच निश्चितच खगोलशास्त्र शिकवले जावे, असे मत डॉ. जयंत नारळीकर म्हणाले होते. हे शिकवत असताना विद्यार्थ्यांना पुस्तक आणि गणिताचा सुरुवातीपासूनच आग्रह धरू नये, असे मत डॉ. मंगला नारळीकर यांनी व्यक्त केले.

Jayant naralikar answer life on different planet
Jayant Narlikar Passes Away: जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे पुण्यात निधन | Astrophysicist

विश्वनिर्मितीच्या महाविस्फोट (बिग बॅंग) सिद्धांताच्या विरुद्ध ‘स्थिर विश्वाचा सिद्धांत’ (स्टेडी स्टेट) मांडला जातो. डॉ. नारळीकरांचे गुरू प्रा. फ्रेड हॉएल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सिद्धांतासंबंधी संशोधन केले होते.

आजवर मिळालेले पुरावे हे महाविस्फोटाच्या सिद्धांताला पूरक आहेत. त्या तुलनेने स्थिर विश्वाच्या सिद्धांताबाबत कमी पुरावे मिळाले आहेत. यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. नारळीकर म्हणाले, ‘‘नवीन संशोधन करताना वैचारिक खुलेपणा स्वीकारायला हवा. १०० वर्षापूर्वीचे भौतिकशास्त्रातील सिद्धांत आणि आजचे सिद्धांत यात मोठा बदल झाला आहे.

विश्वाबद्दल अजूनही आपल्याला फार कमी माहीत आहे. कोणताही सिद्धांत नाकारणे सहज शक्य नाही. मात्र, त्याच्या समर्थनार्थ आपल्याला जास्त पुरावे गोळा करावे लागतील. बिग बँगची स्पष्टता देणाऱ्या ‘रेड शिफ्ट’ बद्दल पुनर्विचार करण्याची गरज आहे. कारण त्यासंबंधीही नवे संशोधने समोर येत आहे. निश्चितच नवे बदल आम्ही स्वीकारत आहोत.’’ असे नारळीकर म्हणाले होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com