प्रक्षेपण क्षमता वाढविण्यावर भर 

पीटीआय
सोमवार, 24 एप्रिल 2017

"इस्रो'चे प्रमुख किरणकुमार यांची माहिती 
हैदराबाद : भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आपल्या प्रक्षेपण क्षमतेत वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असून, वर्षाला बारा प्रक्षेपण करण्याचा मानस आहे, असे "इस्रो'चे प्रमुख ए. एस. किरणकुमार यांनी आज सांगितले. "इस्रो'कडून सध्या वर्षाला सात वेळा प्रक्षेपण केले जाते. 

ते म्हणाले,""पूर्वी आपण एका वर्षात साधारणेपणे दोन ते तीन वेळा प्रक्षेपण करत होतो. गेल्या काही वर्षांत ही क्षमता सातवर गेली आहे. आता अधिक उपग्रहांची निर्मिती करून आणि प्रक्षेपण खर्च कमी करून अधिक उड्डाणे करण्याचा विचार आहे. दरवर्षी नऊ पीएसएलव्ही, दोन जीएसएलव्ही-एमके 2 आणि एक जीएसएलव्ही-एमके 3 यांचा वापर करून एकूण बारा वेळा प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न आहे.'' एका प्रक्षेपण केंद्रावर एकाहून अधिक प्रक्षेपण तळ उभारण्याचा "इस्रो'चा प्रयत्न असून, यामुळे एकाच केंद्रावरून अधिकाधिक उड्डाणे करता येणे शक्‍य होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. 

पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये "चांद्रयान-2' मोहीम राबविण्याचे नियोजन असून, ही मोहीम संपूर्णपणे स्वदेशी आहे, असे किरणकुमार यांनी सांगितले. याशिवाय दुसरी मंगळ मोहीम आणि शुक्र मोहीम यावरही काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
Web Title: ISRO to increase frequency of launches to 12 per year: A S Kiran Kumar