ISRO Pushpak Viman : इस्रोच्या 'पुष्पक' विमानाने रचला इतिहास! भारताच्या पहिल्या रीयूजेबल लाँच व्हीकलची चाचणी यशस्वी

RLV LEX-02 landing : कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे असणाऱ्या एअरोनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये सकाळी 7:10 च्या सुमारास पुष्पकचं यशस्वी लँडिंग झालं.
ISRO Pushpak Viman
ISRO Pushpak VimaneSakal

ISRO Reusable launch vehicle : भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज एक मोठी कामगिरी पार पाडली. इस्रोने आपल्या 'पुष्पक' या रीयूजेबल लाँच व्हीकलची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे असणाऱ्या एअरोनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये सकाळी 7:10 च्या सुमारास पुष्पकचं यशस्वी लँडिंग झालं. हे ऐतिहासिक यश असल्याचं इस्रोने म्हटलं आहे. हे पुष्पक विमान ऑटोमॅटिकली सुरक्षितपणे लँड झालं हे विशेष!

काय होणार फायदा?

रीयूजेबल, म्हणजेच पुन्हा वापर करता येणारे लाँच व्हीकल तयार केल्यामुळे अंतराळ मोहिमांवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. लाँच व्हीकलमध्ये असणारी यंत्रे, पार्ट्स अत्यंत महागडे असतात. आतापर्यंत एकदा प्रक्षेपित केलेलं यान पुढे अंतराळातच सोडून द्यावं लागत होतं. मात्र, आता या चाचणीनंतर हे यान पृथ्वीवर पुन्हा आणता येईल अशी खात्री झाली आहे.

अंतराळातील कचरा होणार कमी

या रियूजेबल लाँच व्हीकलचा फायदा केवळ इस्रोलाच होईल असं नाही. लाँच व्हीकल पुन्हा जमीनीवर आणता येणं शक्य झाल्यामुळे अंतराळातील कचरा देखील कमी होण्यास मदत मिळेल. यामुळे सर्वांनाच मोठा फायदा होणार आहे.

ISRO Pushpak Viman
ISRO Chief S Somanath : आदित्य-L1च्या लाँचिंगच्या दिवशीच झालं कँसरचं निदान, तरीही...; इस्रो प्रमुखांचा मोठा खुलासा

कित्येक वर्षांपासून सुरू आहेत प्रयत्न

गेल्या कित्येक वर्षांपासून इस्रो रीयूजेबल लाँच व्हीकल बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यापूर्वी दोन वेळा अशा रॉकेटचं यशस्वी लँडिंग देखील करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी अशा एका आरएलव्हीला वायुदलाच्या चिनुक हेलिकॉप्टरमधून सोडण्यात आलं होतं. सुमारे साडेचार किलोमीटर उंचीवरुन खाली पडलेलं हे व्हीकल सुरक्षितपणे रनवेवर लँड झालं होतं.

RLVची पहिली चाचणी 23 मे 2016 रोजी श्रीहरीकोटा येथे पार पडली होती. यानंतर काळानुसार त्यामध्ये भरपूर बदल करण्यात आले. आजच्या चाचणीमध्ये पुष्पक विमान पूर्णपणे स्वयंचलितपणे रनवेवर लँड झालं. पॅराशूट, लँडिंग गिअर ब्रेक आणि नोज व्हील स्टिअरिंग सिस्टीम या सर्व यंत्रणा ऑटोमॅटिकली कार्यान्वित झाल्या आणि हे विमान आरामात लँड झालं.

ISRO Pushpak Viman
Space Sector FDI : भारताच्या स्पेस सेक्टरमध्ये आता 100% परकीय गुंतवणुकीला परवानगी; अंतराळ संशोधनाला मिळणार मोठा बूस्ट!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com