esakal | जॅग्‍वार एफ-पेस भारतामध्ये ‍दाखल, जाणून घ्या किंमत
sakal

बोलून बातमी शोधा

जॅग्‍वार एफ-पेस भारतामध्ये ‍दाखल, जाणून घ्या किंमत

जॅग्‍वार एफ-पेस भारतामध्ये ‍दाखल, जाणून घ्या किंमत

sakal_logo
By
प्रणीत पवार

मुंबई : जॅग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाने भारतामध्‍ये नवीन`एफ-पेस` नुकतीच दाखल केली आहे. या कारची भारतातील एक्स शोरुम किंमत ६९.९९ लाख इतकी ठेवण्यात आली आहे. एफ-पेस पहिल्‍यांदाच इंजेनियम २.० लिटर पेट्रोल व डिझेल पॉवरट्रेन्‍समधील आर-डायनॅमिक एस ट्रिममध्‍ये उपलब्‍ध आहे. या कारमध्ये २.० लिटर पेट्रोल इंजिन दिले असून, ते १८४ केडब्‍ल्‍यू पॉवर ती व ३६५ एनएम टॉर्क निर्माण करते. तर २.० लिटर डिझेल इंजिन १५० केडब्‍ल्‍यू पॉवर आणि ४३० एनएम टॉर्क निर्माण करते. (jaguar-f-pace-2021-india-launch-price-in-india)

नवीन जॅग्‍वार एफ-पेस आकर्षक व लक्‍झरी लुकमध्‍ये बेंचमार्क ठरणार आहे. या कारचे आकर्षक लुक्‍स ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल, असा विश्‍वास जॅग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहित सुरी यांनी व्यक्त केला. नवीन एक्स्टि‍‍टीरिअर डिझाइन पुरस्‍कार-प्राप्‍त जॅग्‍वार एफ-पेसला अधिक आकर्षक लूक देण्यात आला आहे. या कारच्या बोनेटवर नवीन कोरीव काम केले असून, नवीन फ्रण्‍ट बंपरसह रिडिझाइन केलेले एअर इन्टेक्‍स व डार्क मेश नवीन एफ-पेसच्‍या आकर्षकतेमध्‍ये अधिक भर घालते. कारमध्ये नवीन सेंटर कन्‍सोल इन्‍स्‍ट्रूमेंट पॅनलपर्यंत वाढवण्‍यात आले आहे. मार्स रेड व सिएना टॅन या दोन रंगांमध्ये ही कार उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा: पालकत्वाच्या ताणाचा लैंगिक इच्छांवर होतो परिणाम?

कारची वैशिष्ट्ये -

- नवीन सुपर-स्लिम ऑल-एलईडी हेडलाइट्स, ग्रिल, रिअर लाईट्स आणि बंपर

- सेकंड रो २ सीटसह पॉवर रिक्‍लाइन, फोर झोन क्‍लायमेट कंट्रोल, इंटरअॅक्टिव्‍ह ड्रायव्‍हर डिस्‍प्‍ले आणि फिक्‍स्‍ड पॅनोरॅमिक रूफ

- ११.४ इंचीच्या एचडी टच स्क्रिनमध्‍ये आधुनिक पीव्ही प्रो-इन्‍फोटेन्‍मेंट तंत्रज्ञानाचा वापर

- केबिन एअर आयोनायझेशन तंत्रज्ञानामुळे आतील हवेचा दर्जा सुधारतो.

- थ्री-डी सराऊंड साऊंड, मेरिडियन ऑडिओ सिस्टिम, स्‍मार्टफोन पॅक आणि रिमोट

संपादन : शर्वरी जोशी

loading image