Japan slim lander : चंद्रावरच्या रात्रीत 'त्याला' आली जाग; जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत

Japan slim lander : चंद्रावरच्या रात्रीत 'त्याला' आली जाग; जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत

टोकियोः जपानने चंद्रावर पाठविलेल्या ‘स्लिम’ (स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिंग मून) या लँडरने पुन्हा एकदा आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. चंद्रावरील रात्रीतील निद्रितावस्थेतून ते तिसऱ्यांदा जागृत झाले आहे. जपानची अवकाश संशोधन संस्था (जाक्सा)ने बुधवारी हा माहिती दिली.

‘स्लिम’ने काढलेले छायाचित्र मिळाल्यानंतर आणि पृथ्वीवरून पाठविलेल्या सिग्नलला त्याने प्रतिसाद दिल्याने ते पुन्हा एकदा जागृत झाल्याची पुष्टी मिळाल्याचे ‘जाक्सा’ने सांगितले.

संस्थेने बुधवारी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की २३ एप्रिलला ‘स्लिम’शी पुन्हा एकदा संपर्क साधण्यास आम्हाला यश आले आहे. ते तिसऱ्यांदा जागृत झाले आहे.

Japan slim lander : चंद्रावरच्या रात्रीत 'त्याला' आली जाग; जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत
Loksabha election 2024 : मंगळसूत्र, आरक्षण अन् वारसाहक्क कर; दुसऱ्या टप्प्यात वादळी प्रचार; शुक्रवारी मतदान

‘स्लिम’च्य नेव्हिगेशन कॅमेऱ्याने रात्री चंद्राच्या पृष्ठभागाचे छायाचित्र काढले आहे. यात चंद्रावर प्रकाश जास्त आणि अंधार कमी दिसत आहे. जपानचे चांद्रयान २० जानेवारीला चंद्रावर उतरले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com