Jio 5G Speed : जिओ 5G ची कमाल; अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड झाला KGF2 पिक्चर

जिओने ऑक्टोबरमध्ये अधिकृतपणे 5 जी सर्व्हिस लॉन्च केली
Jio 5G Speed
Jio 5G Speedesakal

Jio 5G Speed : एखादा साधा गाण्याचा व्हिडीओ डाऊनलोड करायचा झाला तर किती तास वाट पहावी लागते हे काही सांगायला नको. पण, जिओच्या 5G फोनने कमाल केली आहे. जिओच्या या नव्या स्पीडने अवघ्या काही सेकंदात 3 तासाचा एक पिक्चर डाऊनलोड केला आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.

Jio 5G Speed
Jio 5G : High speed 5Gसाठी जिओचा मोठा डाव...Airtelला धक्का

जिओने ऑक्टोबरमध्ये अधिकृतपणे 5 जी सर्व्हिस लॉन्च केली. जिओने बंगळुरु आणि हैदराबादमध्ये 5G सेवा सुरु केली आहे. त्यामुळे आता या 2 शहरात 5G ऑफर वॅलिड असणार आहे. Jio 5G स्पीडचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये यूजरने अवघ्या काही सेकंदात 5GB चा चित्रपट डाउनलोड केली आहे.

Jio 5G Speed
Airtel 5G vs Jio 5G: कोण देईल चांगली सेवा? दोन्हीत नेमका फरक काय आहे? जाणून घ्या

बहुतेक फोनमध्ये 5G SA ला सपोर्ट करणारे नव्हते. त्यामूळे सुरुवातीला खूप कमी युजर्सना Jio कडून 5G सेवा मिळत होती. भारतात असलेले बरेच स्मार्टफोन 5G होते. ते 5G SA ला स्पोर्ट करणारे नव्हते. स्मार्टफोन कंपन्यांनी अलीकडेच अनेक फोनसाठी ओटीए अपडेट सुरू केले आहेत. तेव्हापासून अनेक यूजर्सला Jio 5G सेवा मिळू लागली आहे.

Jio 5G Speed
Airtel 5G Plus vs Jio True 5G: कोणती कंपनी देतेय टॉप 5G स्पीड? येथे पाहा शहरांची यादी

एका यूजरने ट्विटरवर Jio True 5G स्पीडचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये KGF Chapter 2 चित्रपट Jio 5G स्पीडवर केवळ 32 सेकंदात डाऊनलोड केला आहे. हे स्पीड जिओच्या मुंबईतील 5G नेटवर्कवर आहे.

Jio 5G Speed
Astro Tips For Money : घरात पैसा टिकत नाही? करा हा उपाय

Jio True 5G सेवा एकूण 8 शहरांपर्यंत पोहोचली आहे. या अंतर्गत यूजर्स 1Gbps पर्यंत इंटरनेट स्पीड मिळवू शकतात. कंपनीच्या या सेवेचा फायदा - दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, वाराणसी, नाथद्वारा, हैदराबाद आणि बंगळुरू येथे राहणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे.

Jio 5G Speed
Astro Tips : आजार बरा होण्याचं नावचं घेत नाहीये? स्मशानभूमीतले हे उपाय करतील मदत

जिओची वेलकम ऑफर

आपली 5G सेवा वापरण्यासाठी जिओ वेलकम ऑफर देत आहे. ही एक इनवायटेड ऑफर आहे. ज्याचा फायदा फक्त त्या युजर्सना मिळेल ज्यांना कंपनी तिची 5G सेवा वापरण्यासाठी इनवाइट करेल. या ऑफर अंतर्गत युजर्स कोणत्याही खर्चाशिवाय अनलिमीटेड 5G डेटा वापरू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com