Jio Fiber : जिओ एअर फायबर ,गणेश चतुर्थीला येणार 'वीस कोटी घरांपर्यंत पोहोचणार'

जिओचे एअर फायबर फाईव्ह जी नेटवर्क येत्या गणेश चतुर्थीला म्हणजे १९ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे.
jio air fiber
jio air fiber sakal

मुंबई : जिओचे एअर फायबर फाईव्ह जी नेटवर्क येत्या गणेश चतुर्थीला म्हणजे १९ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. ही घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.

अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान तसेच फाईव्ह जी नेटवर्क वापरून जिओ एअर फायबर तर्फे घरात आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा दिली जाईल. यामुळे दूरसंचार क्षेत्रात मोठीच घडामोडी होण्याची अपेक्षा आहे.

jio air fiber
SIM Port : मोबाईल नंबर पोर्ट करायचा आहे? आता घरबसल्या पोर्ट करा Jio चं सिमकार्ड

ऑप्टिकल फायबर सेवेची म्हणजेच जिओ फायबरची देशात एक कोटी कनेक्शन जोडलेली आहेत. तरीही अनेक ठिकाणी वायर कनेक्टिव्हिटी देणे कठीण असल्यामुळे तेथे जिओ एअर फायबर सेवा दिली जाईल. याद्वारे वीस कोटी घरांना कनेक्शन दिली जातील. तर या तंत्राद्वारे रोज दीड लाख नवे ग्राहक जोडले जातील, असेही आज सांगण्यात आले.

jio air fiber
Jio Financial Services: 30,000 कोटी पाण्यात! मुकेश अंबानींच्या कंपनीची सलग चौथ्या दिवशी घसरण

जिओचे ऑप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर पंधरा लाख किलोमीटरवर पसरले असून त्याचा ग्राहक दरमहा सरासरी २८० जीबी पेक्षा जास्त डेटा वापरतो. तो जिओ मोबाईल डेटा वापराच्या दहा पट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com