
एक वर्ष फ्री Disney + Hotstar; पाहा Jio, Airtel अन् Vi चे बेस्ट प्लॅन
आयपीएल (IPL 2022) सीझन जोरात सुरू आहे आणि तो अधिकाधिक रोमांचक होत जाणार आहे. या दरम्यान तुमचा सध्याचा डेटा प्लॅन संपणार असल्यास, आयपीएल सामने पाहण्यासाठी पुरेशा डेटा सोबत Disney+ Hotstar ची वार्षिक सबस्क्रिप्शन देखील देणारे प्लॅन तुम्ही घेऊ शकता. तुमच्या सोयीसाठी, आज आपण या सर्व प्लॅनची यादी पाहाणार आहोत ज्यामध्ये Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) मधून तुम्ही हवा तो प्लॅन निवडू शकता. या प्लॅन कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय एक वर्षाचे Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन देतात. (jio airtel and vi plans with disney plus hotstar one year subscription)
Jio चा 499 रुपयांचा प्लॅन
ही Jio योजना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 499 रुपयांमध्ये Disney + Hotstar मोबाईलची वार्षिक सब्सस्क्रिप्शन देते. प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये यूजरला एकूण 56GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये, दररोज 2GB डेटासह अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहेत. वापरकर्त्यांना प्लॅनसह JioTV, JioCinema, JioCloud आणि JioSecurity सारख्या Jio अॅप्सची सदस्यता देखील मिळते.
हेही वाचा: "शरद पवारांचे नाव घेतले की…"; राज ठाकरेंच्या टिकेवर आव्हाडांचे प्रत्युत्तर
Airtel चा 499 चा प्लॅन
या प्लॅनची तुलना रिलायन्स जिओच्या 499 रुपयांच्या प्लॅनशी केली जाऊ शकते. हे 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा देते. प्लॅनमध्ये, यूजरला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. अॅड-ऑन बेनिफिट्समध्ये 1 वर्षासाठी Disney+ Hostar सब्सस्क्रिप्शन समाविष्ट आहे. Amazon Prime Video ची 1-महिन्याची ट्रायल (प्रति वापरकर्ता एकदा) आणि Apollo 24/7, Shaw Academy आणि Wink Music सारखे फायदे देखील समाविष्ट आहेत.
हेही वाचा: नाशिकजवळ रेल्वेचे डबे रुळावरुन घसरले; एक प्रवाशी ठार, अनेक जखमी
Vi चा 499 चा प्लॅन
बेसिक वैधता आणि डेटाबद्दल बोलायचे तर, Vodafone-Idea चा 499 रुपयांचा प्लॅन Airtel आणि Jio सारखाच आहे. हे 28 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 2GB डेटा देखील देते. प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. मुख्य फरक योजनेद्वारे ऑफर केलेल्या फायद्यांमध्ये आहे. व्होडाफोन आयडिया "बिंज ऑल नाईट" ही अनोखी ऑफर देत आहे. सब्सस्क्रायबर्सना पॅक डिडक्शनखेरीज दुपारी 12 ते सकाळी 6 या वेळेत सर्फ, स्ट्रिम आणि शेअर करता येईल. कंपनी वीकेंड डेटा रोलओव्हरसह 2GB बॅकअप डेटा, Disney+ Hostar, Vi Movies आणि TV ची वार्षिक सब्सस्क्रिप्शन देखील देत आहे, ज्याचा तुमचा दैनिक कोटा संपल्यावर तुम्ही बॅकअप डेटा क्लेम करू शकता.
हेही वाचा: मुंबई-गोवा महामार्गचं काम कधी पूर्ण होणार?; नितीन गडकरींनी दिलं उत्तर
Web Title: Jio Airtel And Vi Plans With Disney Plus Hotstar One Year Subscription Under Rs 499 Check Details
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..