Jio Best Recharge Plan : तीन महिने वैधतेसह जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन, खर्च होईल निम्मा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jio best recharge plan rs 395 unlimited calls and data for 84 days jio Affordable plan

Jio Best Recharge Plan : तीन महिने वैधतेसह जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन, खर्च होईल निम्मा

Jio Best Recharge Plan : रिलायन्स जिओ ग्राहकांच्या सोयी आणि गरजेनुसार वेगवेगळे प्रीपेड प्लॅन देत आहेत. जर तुम्ही एका महिन्याच्या वैधतेऐवजी असा प्लॅन शोधत असाल, ज्यामध्ये तुम्हाला तीन महिन्यांची वैधता मिळेल आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग देखील मिळेल. तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

आज आपण Jio च्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्याची वैधता तीन महिन्यांची आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला तीन महिन्यांच्या वैधतेसह अनेक फायदे मिळतील. चला जाणून घेऊया Jio च्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल.

जिओच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 395 रुपये आहे. Jio च्या 395 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 84 दिवसांची वैधता मिळत आहे.

हा प्लॅन रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला इंटरनेट वापरासाठी डेटा देखील मिळत आहे. जर तुम्ही दररोज खूप इंटरनेट वापरत नसाल. अशा परिस्थितीत जिओचा हा प्लॅन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

हेही वाचा: Anand Mahindra: 'लॉरेल अँड हार्डी'चा 'नाटू-नाटू'वर बुंगाट डान्स! महिंद्रांनी शेअर केला Video

395 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 6 GB इंटरनेट डेटा मिळतो. तुम्हाला प्लॅनमध्ये डेली डेटा लिमिटची सुविधा मिळत नाही. प्लॅनमध्ये उपलब्ध 6 GB इंटरनेट डेटाची वैधता एकूण 84 दिवसांसाठी आहे. हाय स्पीड डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होतो.

Jio चा हा स्वस्त रिचार्ज प्लान तुमच्या फोनमध्ये रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला मेसेजिंगसाठी 1000 SMS ची सुविधा देखील मिळते. त्याची वैधता देखील एकूण 84 दिवसांसाठी उपलब्ध आहे. इतकंच नाही तर इतरही अनेक सुविधा या प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत.

हेही वाचा: Hardik Pandya Viral Video : टीम इंडियात फूट? भर मैदानात पांड्याने विराटला केलं फुल इग्नोर

395 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio च्या इतर अॅप्स जसे की Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील मिळते. त्यामुळे जर तुम्ही इंटरनेटचा जास्त वापर करत नसाल आणि तुम्हाला दीर्घ वैधतेसह अमर्यादित कॉलिंगसह परवडणारा प्लॅन हवा असेल, तर Jio चा हा 395 रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

टॅग्स :Jio