Jio चे जबरदस्त प्रीपेड प्लॅन, फ्री कॉलिंगसह रोज मिळेल 2GB डेटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jio

Jio चे जबरदस्त प्रीपेड प्लॅन, फ्री कॉलिंगसह रोज मिळेल 2GB डेटा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

रिलायन्स जिओने ही टेलिकॉम कंपनी त्यांच्या ग्राहकांना बेस्ट रिचार्ज प्लॅन ऑफर्स दिल्या जातात. अनेक जबरदस्त रिचार्ज प्लॅन ग्राहकांना ऑेफर करते. यामध्ये हायस्पीड डेटा, फ्री कॉलिंग या सोबतच प्रीमियम अॅप सबस्क्रिप्शन देखील ग्राहकांना दिले जात आहे. एअरटेल आणि व्ही सारख्या इतर टेलिकॉम कंपन्यांना जिओ जोरदार टक्कर देत आहे. आज आपण जिओच्या अशाच दोन प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यात तुम्हाला दररोज 2GB डेटासह अनलिमीटेड कॉलिंग देखील मिळेल.

जिओचा 249 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओच्या या प्रीपेड प्लॅन वैधता 28 दिवसांचीअसून या डेटा प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा 100 SMS देण्यात येतात. तसेच वापरकर्त्यांना फ्री कॉलिंग सुविधा दिली जाते. याशिवाय रिचार्ज पॅकसह जिओ टीव्ही, मूव्हीज, न्यूज, क्लाउड आणि सिक्युरिटी सारख्या प्रीमियम अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.

जिओचा 599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओच्या या प्रीपेड पॅकची वैधता 84 दिवसांची असून या डेटा प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा 100SMS उपलब्ध आहेत. तसेच वापरकर्त्यांना फ्री कॉलिंग सुविधा दिली जाते. याशिवाय रिचार्ज पॅकसह जिओ टीव्ही, मूव्हीज, न्यूज, क्लाउड आणि सिक्युरिटी सारख्या प्रीमियम अॅप्सचे सबस्क्रिप्शन दिले जाते.

हेही वाचा: सर्वात स्वस्त पण सर्वात सेफ, TATA ची 'ही' SUV ठरली बेस्ट

एअरटेल 249 रुपयांचा प्लान

एअरटेलचा हा प्रीपेड प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या पॅकमध्ये 100SMS सह दररोज 1.5GB डेटा दिला जातो. यासोबत फ्री कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. इतर सेवांबद्दल बोलायचे झाल्यास हे रिचार्ज पॅक Amazon प्राइम व्हिडिओ, विंक म्युझिक आणि फ्री कॉलरट्यून अॅक्सेस देतात

VI चा 249 रुपयांचा प्लॅन

वोडाफोन आयडियाचा हा प्रीपेड प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या पॅकमध्ये 100 SMS सह दररोज 1.5GB डेटा दिला जातो. यासोबत फ्री कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, डेटा पॅकमध्ये वापरकर्त्यांना Binge All Night, Weekend Data Rollover आणि Vi Live TV आणि Movies चा अॅक्सेस दिला जातो.

हेही वाचा: नोकियाचा सर्वात स्वस्त 5G फोन Nokia G300 लॉंच, पाहा किंमत

loading image
go to top