जिओ 5 महिने डेटा देणार फ्री तर एअरटेलकडून 100 जीबी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 August 2020

स्वातंत्र्यदिना निमित्त एअरटेल आणि जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी खास ऑफर दिल्या आहेत.

नवी दिल्ली - रिलायन्स जिओने आज 15 ऑगस्ट रोजी जिओ ग्राहकांसाठी एक मोठी ऑफर जाहीर केली आहे. जर ग्राहकांनी jioFi चा वायरलेस हॉटस्पॉट खरेदी केला तर ग्राहकांना मोठा फायदा होऊ शकतो. कारण याच्या खरेदीनंतर जिओच्या ग्राहकांना पुढील पाच महिने मोफत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सोय मिळणार आहे. या  jioFi वायरलेस हॉटस्पॉटची किंमत 1999 असणार आहे. या ऑफरचा फायदा उठवण्यासाठी आधी jioFi चा एखादा प्लान निवडावा लागणार आहे. हे jioFi वायरलेस हॉटस्पॉट ग्राहकांना रिलायन्स डिजीटल स्टोअरमधून आणि कंपनीच्या वेबसाईटवरुनही खरेदी करता येणार आहे. 

जन्माष्टमीच्या मुहूर्तावर रिलायन्स जिओने अजुन एक मोठी ऑफर लॉंच केली आहे.  यामध्ये jiophone 2 फक्त 141 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येणार आहे.  जिओने 2017 मध्ये पहिला फिचरफोन 'jiophone' बाजारात आणला होता. या  jiophone 2 ची किंमत 2999 रुपये असणार आहे. हा फोन कंपनी आता कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर 141 रुपयांच्या EMI व्दारे विकला जात आहे. या फोनमध्ये 2.4 इंचाचा डिस्प्ले, 2000 mAh ची बॅटरी, 4जी, क्वार्टी की पॅड आहे. तसेच 512mb रॅम आणि 4 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच हे स्टोरेज मेमरी कार्डद्वारे 128gb पर्यंत वाढवता येते.  

हे वाचा - One Plus 8 - जबरदस्त डिस्प्लेसह आकर्षक फीचर्स

एअरटेलनेही स्वातंत्र्यदिना दिवशी ग्राहकांसाठी मोठी ऑफर लॉंच केली आहे. हा प्लान एअरटेल एक्सट्रीम फाइबर होम ब्रॉडबॅंड सेवा घेणाऱ्या ग्राहकांना जास्तीचा 1000 GB डेटा मिळणार आहे. ही ऑफर सगळ्या एक्सट्रीम फाइबर होम ब्रॉडबॅंड प्लान असणाऱ्यासाठी आहे. एअरटेल एक्सट्रीम फाइबर होम ब्रॉडबॅंड प्लानची किंमत 799 पासून सुरू होते तसेच ह्या ऑफर Airtel Thanks बेनिफिट्सही मिळतात. यामध्ये 12 महिने Amazone Prime ची मेंबरशीप आणि विंक म्यूजिक चा अॅक्सेसही मिळतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jio launch wireless hotspot airtel extreme fiber home boradband