One Plus 8 - जबरदस्त डिस्प्लेसह आकर्षक फीचर्स

one plus 8 a
one plus 8 a

वन प्लसच्या युजर्ससाठी One Plus 7T नंतर आता One Plus 8 लाँच झाला आहे. भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहिम सुरु होण्याआधीच बाजारात आलेल्या वन प्लस 8 मध्ये हाय रिझोल्यूशन, रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि जबरदस्त क्वालिटीचा कॅमेरा आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट असून 5 जी आहे. 90Hz रिफ्रेश रेट असलेल्या या फोनमुळे अनिमेशन आणि ग्राफीक्सचा चांगला अनुभव मिळणार आहे. 

वन प्लस 8 हा दोन रंगात उपलब्ध आहे. यामध्ये रेग्युलर ब्लॅक कलर आणि ग्रीनचा समावेश आहे. 6.55 mm चा AMOLED डिस्प्ले यामध्ये आहे. फ्रंट कॅमेरा top left corner ला आहे. डिस्प्ले आकर्षक असा असून कर्व एजेसमुळे पनोरॅमिक व्ह्यू जबरदस्त दिसतो. 

हाताळण्यासाठी वन प्लस 8 थोडा मोठा वाटू शकतो. सध्या मोठ्या फोनच्या आणि डिस्प्लेच्या ट्रेंडमध्ये वन प्लस 8 मध्ये वेगळेपण देण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच सी टाइप चार्जिंग पोर्ट आणि सिम कार्ड पॅनेल एकाच बाजुला देण्यात आलं आहे. वन प्लस 8 मध्ये 6.55 इंच AMOLED डिस्प्ले आहे. One Plus 8 मध्ये Oxygen OS आहे.

फिंगरप्रिंट अनलॉक सेन्सर स्क्रीनवरच आहे. तसंच फेस रिकग्निशनचा पर्यायसुद्धा आहे. आवाजाची क्वालिटीसुद्धा जबरदस्त आहे. यामुळे तुम्ही इतर डिव्हाइस वापरण्याऐवजी मोबाइलवरच आवाज ऐकणं पसंत कराल. फोनच्या कॅमेरा क्वालिटीबाबत थोडी नाराजी असू शकते. वन प्लस 8 मध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असून Sony IMX586 सेन्सर आहे. ट्रिपल कॅमेरा फीचरमध्ये 48-16-2 मेगापिक्सल कॅमेरे आहेत. 

स्मार्टफोनच्या बॅटरी लाइफबद्दल सांगायचं झालं तर One Plus 8 ची बॅटरी 4,300 mAh क्षमतेची असून 30 वॅट WARP चार्जर 50 मिनिटांपेक्षा कमी वेळेत चार्ज होते. नेहमीच्या वापरात चार्जिंग 24 तासांपर्यंत टिकतं पण हॉटस्पॉट, इंटरनेटचा जास्त वापर, लाइव्ह स्ट्रिमिंगमुळे हा काळ कमी होऊ शकतो. 

टेक्नॉलॉजीच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सध्या बाजारात वन प्लस 8 Pro आणि वन प्लस Nord हे दोन्ही फोन आहेत. वन प्लस 8 च्या तुलनेत Realme X50 Pro आणि iQOO 3 हे फोन तेवढयाच किंमतीत मिळतात. वन प्लस 7T वापरलेल्यांसाठी यामध्ये फार मोठे अपग्रेड आहेत असं नाही. पण जर वन प्लस 7T वापरला नसेल तर हा फोन घ्यायला हरकत नाही. 

One Plus 8: Key specs
Display: 6.55 Full HD+ (2400 x 1080) Fluid AMOLED display with 90 Hz refresh rate and 3D Corning Gorilla Glass
Camera: 48MP (main) + 16MP (ultra-wide) + 2MP (macro); 16MP (wide) selfie camera
Battery: 4,300 mAh, 30-watt fast charger 
Android version: Oxygen OS 10
Storage: 6 GB, 8 GB, 12 GB RAM options; 128 GB or 256 GB UFS 3.0 internal storage
Processor: Qualcomm Snapdragon 865 
Other specs: 5G compliant; Bluetooth 5.1; Dual band WiFi 
Price in India:
Rs 41,999 for 6 GB Ram with 128 GB internal storage
Rs 44,999 for 8 GB Ram with 128 GB internal storage
Rs 49,999 for 12 GB Ram with 256 GB internal storage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com