Jio Prepaid Plan : जिओचे दररोज 1GB डेटा प्लॅन, किंमती 149 पासून सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jio Prepaid Plan

Jio Prepaid Plan : जिओचे दररोज 1GB डेटा प्लॅन, किंमती 149 पासून सुरु

रिलायन्स जिओ ही सध्या देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशभरात जिओचे कोट्यावधी वापरकर्ते आहेत. दरम्यान जिओकडे अनेक प्रकारचे प्री-पेड प्लॅन आहेत जे वापरकर्त्यांच्या गरजेनुसार डिझाइन केले गेले आहेत. अनेक प्लॅन्स दररोज 1 GB डेटासह असतात आणि अनेक प्लॅन्स 3 GB डेटासह येतात. परंतु सर्वाधिक मागणी दररोज 1 GB डेटा असलेल्या प्लॅन्सना असते.

तुमच्यापैकी असे बरेच लोक असतील जे दररोज 1 GB डेटासह Jio चा प्लॅन वापरतात किंवा असेच प्लॅन शोधत असतील. आज आपण तुम्हाला दररोज 1 GB डेटा ऑफर करणाऱ्या Jio च्या सर्व प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत.

जिओ (Jio) चा 149 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा मिळतो. त्याची वैधता 20 दिवस आहे. कंपनीचा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे ज्यामध्ये दररोज 1 GB डेटा आहे. या प्लानमध्ये एकूण 20 जीबी डेटा मिळणार आहे. डेटा व्यतिरिक्त या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये दररोज 100 एसएमएस मिळणार आहेत.

हेही वाचा: युक्रेनसाठी 'फ्री कॉलिंग'; व्होडाफोनसह डझनहून अधिक कंपन्यांची घोषणा

जिओचा 179 रुपयांचा प्लॅन

कंपनीचा हा दुसरा प्लॅन आहे ज्यामध्ये दररोज 1 GB डेटा दिला आहे. Jio च्या 179 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 24 दिवस आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस रोज मिळतात. या प्लॅनमध्ये सर्व जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

हेही वाचा: बापरे! युट्यूब बघून फार्मसी विद्यार्थ्यांनी केली लिंगबदल शस्त्रक्रिया; एकाचा मृत्यू

जिओचा 209 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या 209 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनमध्ये दररोज 1 GB डेटा मिळतो. या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये देखील अमर्यादित कॉलिंग आणि सर्व Jio अॅप्सचा एक्से, दररोज 100 SMS उपलब्ध आहेत.

हेही वाचा: 'मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या दबावापुढे झुकू नये' - आशिष शेलार

Web Title: Jio Prepaid Plan With 1gb Daily Data Plans Start At Rs 149 Only Check List

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JioPrepaid Plan