Disney+ Hotstar वर्षभर मोफत पाहण्याची सुवर्णसंधी, 'या' 3 प्रीपेड प्लॅनवर ऑफर उपलब्ध

आजकाल अनेक चित्रपट, वेबसिरीज आणि विविध प्रकारचे शोज ओटीटी माध्यमांवर रिलीज होत आहेत. शिवाय, याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Disney+ Hotstar
Disney+ Hotstaresakal

Disney+ Hotstar : आजकाल अनेक चित्रपट, वेबसिरीज आणि विविध प्रकारचे शोज ओटीटी माध्यमांवर रिलीज होत आहेत. शिवाय, याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे, ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन मिळवण्यावर प्रेक्षक भर देताना दिसत आहेत. त्यासाठी मग, रिचार्ज प्लॅन्स घ्यावे लागतात.

जर तुम्हाला डिझ्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन कोणत्याही रिचार्ज प्लॅनसह अगदी मोफत हवे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला रिचार्च प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला डिझ्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन हे २ महिन्यांसाठी नाही तर संपूर्ण वर्षभरासाठी मोफत मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात या रिचार्ज प्लॅन्सबाबत. हे सर्व रिचार्ज प्लॅन्स जिओचे प्रीपेड प्लॅन्स आहेत.

Disney+ Hotstar
Reliance-Disney Merger : रिलायन्स - डिज्ने एकत्र येणार, भारतातील स्ट्रीमिंग मार्केटवर अधिराज्य गाजवणार?

जिओचा ४४९८ चा प्लॅन

जिओचा हा सर्वात महागडा प्रीपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये युझर्सना केवळ ३६५ दिवसांची वैधता मिळते आणि डिझ्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन देखील १ वर्षासाठी फ्री आहे.

एवढेच नव्हे तर जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये डिझ्ने प्लस हॉटस्टारसोबतच, Amazon Prime, SonyLiv आणि झी5 यासह तब्बल १४ ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. या व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी दररोज 2जीबीचा डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० SMS ची सुविधा देखील मिळते.

३१७८ रूपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन

जिओ प्रीपेड प्लॅनच्या यादीतील हा दुसरा रिचार्ज प्लॅन आहे. हा प्लॅन ३१७८ रूपयांचा असून यामध्ये युझर्सना केवळ ३६५ दिवसांची वैधता मिळते. शिवाय, डिझ्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी विनामूल्य मिळते. त्यासोबतच,  २८ दिवसांसाठी दररोज 2 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि रोज 100 SMS ची सुविधा देखील युझर्सना या प्लॅनमध्ये मिळते.

जिओचा ५९८ रूपयांचा प्रीपेड प्लॅन

हा या यादीतील जिओचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये युझर्सना २८ दिवसांची वैधता मिळते आणि डिझ्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी पूर्णपणे विनामूल्य मिळते. या सोबत या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी दररोज 2 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि रोज 100 SMS ची सुविधा देखील युझर्सना या प्लॅनमध्ये मिळते.

विशेष म्हणजे या तिन्ही प्लॅनमध्ये युझर्सना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडवर मोफत सुविधा मिळते.

Disney+ Hotstar
Disney+ Hotstar : नेटफ्लिक्सनंतर आता डिज्नी+हॉटस्टारचाही यूजर्सना दणका! पासवर्ड शेअरिंग केलं बंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com