JIOचे जबरदस्त प्रीपेड प्लॅन्स; ३३६ दिवसांच्या वैधतेसह डेटा, कॉलिंग आणि एसएमएस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jio

JIOचे जबरदस्त प्रीपेड प्लॅन्स; ३३६ दिवसांच्या वैधतेसह डेटा, कॉलिंग आणि एसएमएस

मुंबई : गेल्या वर्षाच्या अखेरीस टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या. जिओने गेल्या काही महिन्यांत अनेक नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या नवीनतम मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून, कंपनीने काही नवीन योजना सादर केल्या आहेत ज्यांची वैधता ३० दिवस आहे. रिचार्ज सर्कल तसेच राहावे म्हणून हे केले आहे.

हेही वाचा: फक्त २ हजार ५४२ रुपयांमध्ये iphone 12 खरेदी करण्याची संधी

Jio बद्दल बोलायचे झाले तर, कंपनी वापरकर्त्यांना अनेक जबरदस्त योजना प्रदान करते. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल, रोजचा डेटा, एसएमएस आणि इतर अनेक फायदेही दिले जातात. यासोबतच लाइव्ह टीव्ही, मूव्हीज, म्युझिक यासारखे जिओ अॅप्सही उपलब्ध करून दिले आहेत. कंपनीने असे अनेक बदल केले आहेत. Jio अनेक प्लॅन ऑफर करते जे वेगवेगळ्या वैधतेसह येतात.

१५५ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन

१५५ रुपयांचा नवीन प्रीपेड पॅक कोणत्याही दैनिक मर्यादेशिवाय 2GB हायस्पीड 4G डेटा ऑफर करतो. यामध्ये ३०० एसएमएस दिले जात आहेत. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. यामध्ये जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही दिले जात आहे. त्याची वैधता २८ दिवस आहे.

३९५ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन

३९५ रुपयांचा नवीन प्रीपेड पॅक कोणत्याही दैनिक मर्यादेशिवाय 6GB हाय स्पीड 4G डेटा ऑफर करतो. यामध्ये १००० एसएमएस दिले जात आहेत. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. यामध्ये जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही दिले जात आहे. त्याची वैधता ८४ दिवस आहे.

१५५९ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन

१५५९ रुपयांचा नवीन प्रीपेड पॅक कोणत्याही दैनिक मर्यादेशिवाय 24GB हायस्पीड 4G डेटा ऑफर करतो. यामध्ये ३६०० एसएमएस दिले जात आहेत. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. यामध्ये जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही दिले जात आहे. त्याची वैधता ३३६ दिवस आहे.

Web Title: Jios Awesome Prepaid Plans Data Calling And Sms With 336 Days Validity

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jiorecharge
go to top