
BSNL offer : हा १९ रुपयांचा रिचार्ज करा आणि फोन महिनाभर चालवा
मुंबई : आजकाल देशातील मोठ्या टेलिकॉम कंपन्या यूजर्सना खूश ठेवण्यासाठी नवनवीन प्लान आणत आहेत, ज्यांना लोकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. जिओ आणि एअरटेलला मागे टाकण्यासाठी, देशातील सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने एक जबरदस्त योजना आणली आहे. अतिशय कमी किंमतीत महिन्याभराचे लाभ या योजनेत उपभोगता येणार आहेत.
हेही वाचा: JIOचे जबरदस्त प्रीपेड प्लॅन्स; ३३६ दिवसांच्या वैधतेसह डेटा, कॉलिंग आणि एसएमएस
बीएसएनएल प्लॅनची खासियत जाणून घ्या
बीएसएनएलच्या १९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनने सध्या बाजारात खळबळ उडवून दिली आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची वैधता महिनाभर राहाते. वास्तविक, या योजनेचा मुख्य उद्देश नंबर चालू ठेवण्याची सुविधा प्रदान करणे हा आहे. या प्लॅनची वैधता ३० दिवसांसाठी उपलब्ध आहे.
तसेच, हे रिचार्ज केल्यानंतर, तुमचा कॉलरेट २० पैसे होतो. या रिचार्जचे वैशिष्ट्य म्हणजे तो केल्यानंतर तुम्हाला महिनाभर रिचार्जचे टेन्शन घेण्याची गरज नाही. एकदा रिचार्ज केल्यानंतर, तुमचा फोन महिनाभर चालेल. संपूर्ण महिनाभर तुम्ही कॉल्स ऐकू शकता आणि तुम्हाला कोणतेही पैसे देण्याची गरज नाही.
हेही वाचा: जिओच्या ३ रिचार्ज प्लॅनच्या किंमतींत वाढ; असे आहेत तपशील
BSNL चा ७५ रुपयांचा प्लॅन मन जिंकत आहे
बीएसएनएलचा हा प्लॅनही मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण महिन्यासाठी २०० मिनिटे मिळतात. तुम्ही त्यांचा वापर स्थानिक आणि राष्ट्रीय कॉलिंगसाठी करू शकता. यासोबत तुम्हाला संपूर्ण महिन्यासाठी 2 GB डेटा मिळेल.
जर तुम्ही असा प्लान शोधत असाल ज्यामध्ये तुम्हाला कॉलिंग आणि डेटा दोन्ही मिळतील आणि स्वस्त देखील असेल, तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम प्लान ठरू शकतो. या प्लॅनचा एकमात्र दोष म्हणजे यात एसएमएसचा फायदा मिळणार नाही.
जर तुम्ही अशा प्लानचा विचार करत असाल ज्यामध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि डेटा मिळेल तर, तुमच्यासाठी १४७ रुपयांचा प्लॅन योग्य ठरेल. या प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे आणि तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा पर्याय मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण महिन्यासाठी 10GB डेटा देखील मिळतो. तसेच, यामध्ये मोफत बीएसएनएल ट्यूनदेखील उपलब्ध आहेत.
Web Title: Bsnl Offer Recharge This For Rs 19 And Run The Phone For A Month
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..