जिओचा एकच प्लॅन! डेटा, कॉलिंगसह NetFlix-Prime आणि हॉटस्टार फ्री

Jio Recharge
Jio Rechargesakal
Summary

गेल्या महिन्यात रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडियाने त्यांच्या प्रीपेड प्लॅनचे दर वाढवले होते.

गेल्या महिन्यात रिलायन्स जिओ (Jio), एअरटेल (Airtel), व्होडाफोन-आयडियाने (Vodafone-Idea) त्यांच्या प्रीपेड प्लॅनचे दर वाढवले होते. यामुळे प्रत्येक प्लॅनमध्ये १५ ते २० टक्के वाढ झाली. यानंतर आता कंपन्यांनी नव्या ऑफर ग्राहकांना देण्यास सुरुवात केली आहेत. आता रिलायन्स जिओने ओटीटी (OTT) पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी खास प्लॅन लाँच केला आहे. ४०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटासह ओटीटी प्लॅटफॉर्मचेही सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

जिओने त्यांचा हा प्लॅन पोस्टपेड ग्राहकांसाठी आणला आहे. ३९९ रुपयांचा हा प्लॅन सामान्यपणे महाग वाटेल, मात्र यामध्ये अनेक ऑफर मिळत आहेत. डेटा आणि कॉलिंगशिवाय इतर अनेक सुविधा या प्लॅनमधून ग्राहकांना मिळतील. पोस्टपेडच्या या प्लॅनमध्ये दर महिन्याला ७५ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच दर दिवशी अडीच जीबी डेटा वापरू शकतात. तसंच ७५ जीबी डेटा संपल्यानंतर दहा रुपये प्रति जीबी डेटा वापरता येईल. यात २०० जीबी पर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधासुद्धा आहे.

अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस या प्लॅनमध्ये मिळणार आहेत. तसंच नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, डिजने हॉटस्टार, जिओ टीव्ही, जिओ सिक्युरीटी आणि जिओ क्लाऊडचं सब्सक्रिप्शनदेखील या प्लॅनमध्ये आहे. ३९९ रुपयांचा हा प्लॅन जीएसटीसह ४७० रुपयांना मिळतो.

Jio Recharge
७,५०० च्या आत मिळतील ५ स्मार्टफोन; कमी बजेटमध्ये उत्तम फीचर

प्रिपेडवर जर दररोज २ जीबी इंटरनेटचा प्लॅन घेतला तर त्यासाठी महिन्याला २९९ रुपये मोजावे लागतात. पोस्ट पेड प्लॅनपेक्षा यात दर दिवशी ५०० एमबी कमी इंटरनेट मिळते. तर नेटफ्लिक्सच्या प्लॅनसाठी १४९ रुपये मोजावे लागतात. याशिवाय हॉटस्टारसाठी वर्षाला ४९९ रुपये आणि अमेझॉन प्राइमसाठी १४९९ रुपये वर्षाकाठी मोजावे लागतात. तसे पाहिले तर या सर्वांचे सब्सक्रिप्शन घेतलं तर ५०० रुपयांपेक्षा जास्त पैसे महिन्याला मोजावे लागतात. त्या तुलनेत पोस्टपेडमध्ये जास्त फायदे मिळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com