७,५०० च्या आत मिळतील ५ स्मार्टफोन; कमी बजेटमध्ये उत्तम फीचर| Smartphone | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

smartphones

७,५०० च्या आत मिळतील ५ स्मार्टफोन; कमी बजेटमध्ये उत्तम फीचर

स्मार्टफोन (Smartphone) ही काळाची गरज झाली आहे. अनेक काम मोबाईलवरून सहज होत असल्याने स्मार्टफोनकडे नागरिकांचा कल वाढत चालला आहे. यामुळेच स्मार्टफोन कंपन्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी कमी बजेटमध्ये मस्त फीचर्स (Great feature on a low budget) असलेले अनेक हँडसेट देत आहेत. कमी बजेटमध्ये उत्तम फीचर असलेला हँडसेट घ्यायचा असेल तर पर्यायांची कमतरता नाही. बाजारात ७,५०० रुपयांखाली स्मार्टफोन उपलब्ध आहेत. चला तर जाणून घेऊया या मोबाईल विषयी...

टेक्नो स्पार्क गो २०२२

टेक्नो स्पार्क गो २०२२ या स्मार्टफोनची किंमत ७,४९९ रुपये आहे. या फोनमध्ये २ GB रॅम आणि ३२ GB स्टोरेज आहे. फोनमध्ये १२०Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह ६.५२ इंचचा HD+ डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये कंपनी १३ मेगापिक्सलचा AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देत आहे. फोनमध्ये ५०००mAh बॅटरी आहे.

हेही वाचा: पुलवामा हल्ला; पोलिस करणार मृत दहशतवाद्याची डीएनए चाचणी?

रियलमी नारजो 50i

२ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत ७,४९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले आहे. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये (Smartphone) SC9863A चिपसेट मिळेल. ५०००mAh बॅटरीने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये ८ मेगापिक्सेल रियर आणि ६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये तुम्ही २५६ जीबीपर्यंतचे मायक्रो एसडी कार्ड देखील ठेवू शकता.

लावा Z3

हा लावा फोन ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो. यामध्ये कंपनी ६.५ इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये MediaTek Helio A20 चिपसेट मिळेल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रियर आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. लावाच्या या एंट्री लेव्हल स्मार्टफोनची किंमत ७,२९९ रुपये आहे.

हेही वाचा: ATM मधून पैसे काढताय? जास्त व्यवहारांसाठी द्यावं लागणार इतके शुल्क

रियलमी C11 २०२१

२ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत ७,४९९ रुपये आहे. फोनमध्ये तुम्हाला ६.५ इंचाचा HD+ डिस्प्ले मिळेल. ऑक्टा-कोर प्रक्रियेवर काम करताना या फोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा मागील आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर हा फोन ५०००mAh बॅटरीसह येतो.

इनफीनिक्स स्मार्ट 5

इनफीनिक्स स्मार्टफोन ७,४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ६०००mAh बॅटरीने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये ६.८२ इंच HD+ डिस्प्ले आहे. हा फोन MediaTek Helio G25 प्रोसेसरवर काम करतो. फोनच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :phoneCameraBattery
loading image
go to top