Relience recharge plan
Relience recharge plan Sakal

Jio च्या 4 स्वस्त प्लॅन; 119 रुपयांमध्ये मिळणार दररोज 1.5GB डेटा

जिओकडे प्रीपेड रिचार्जचे विविध प्लॅन उपलब्ध आहेत.

रिलायन्स जिओकडे प्रीपेड प्लॅनची ​​एक लांबलचक यादी आहे, परंतु सर्वाधिक मागणी 1.5 GB डेटा + कॉलिंगसह येणाऱ्या रिचार्जची आहे. जिओचे एकूण 9 प्रीपेड प्लॅन आहेत, ज्यामध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. येथे आम्ही तुमच्यासाठी Jio च्या 4 स्वस्त प्लॅनची ​​यादी आणली आहे, ज्यामध्ये दररोज 1.5 GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला 1 महिन्याची वैधता मिळते.

जिओचा 119 रुपयांचा प्लॅन-

हा Jio चा सर्वात स्वस्त 1.5 GB डेटा प्लान आहे. यामध्ये ग्राहकांना 14 दिवसांची वैधता मिळते. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 21 जीबी डेटा मिळेल. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग + 300 एसएमएस दिले आहेत. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचं सबस्क्रिप्शन मिळते.

Relience recharge plan
दररोज 1GB डेटा देणारे Jio, Airtel चे स्वस्तात मस्त प्लॅन

जिओचा 199 रुपयांचा प्लॅन-

जिओचा 199 रुपयांचा प्लॅन एकूण 23 दिवसांची वैधता देतो. दररोज 1.5 GB डेटानुसार, तुम्हाला एकूण 34.5 GB डेटा मिळतो. यामध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस दिले जातात. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन उपलब्ध आहे.

जिओचा 239 रुपयांचा प्लॅन-

हा Jio चा प्रीपेड प्लान आहे ज्याची वैधता 28 दिवस आहे. यामध्ये ग्राहकांना एकूण 42 जीबी डेटा मिळेल. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग + 100 SMS/दिवस दिले जातात. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सना सबस्क्रिप्शन मिळते.

Relience recharge plan
एक वर्ष फ्री Disney + Hotstar; पाहा Jio, Airtel अन् Vi चे बेस्ट प्लॅन

जिओचा 259 रुपयांचा प्लॅन-

Jio च्या 259 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता एक महिन्याची आहे. दररोज 1.5 GB डेटानुसार, तुम्हाला एकूण 45 GB पर्यंत डेटा मिळेल. यामध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस दिले जातात. तसेच जिओ अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com