Prepaid Plan : दररोज 1GB डेटा देणारे Jio, Airtel चे स्वस्तात मस्त प्लॅन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


affordable jio and airtel daily 1 gb data plan with unlimited calling

दररोज 1GB डेटा देणारे Jio, Airtel चे स्वस्तात मस्त प्लॅन

जर तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत डेटा आणि कॉलिंगचा प्लॅन हवा असेल तर Airtel आणि Jio कडे असे अनेक पर्याय आहेत. दोन्ही कंपन्या 1GB डेटा प्रतिदिन ते 3GB डेटा प्रतिदिन अशा अनेक योजना ऑफर करतात.आज आपण Reliance Jio आणि Bharti Airtel च्या प्रीपेड प्लॅन बद्दल जाणून घेणार आहोत ज्यात 1GB डेली डेटा आणि कॉलिंग मिळते,

Reliance Jio

Reliance Jio चे 3 प्लॅन आहेत ज्यात 1GB डेटा प्रतिदिन दिला जात आहे. त्यांची किंमत 149 रुपये, 179 रुपये आणि 209 रुपये आहे.149 च्या Jio प्लॅनमध्ये ग्राहकांना 20 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा दिला जातो. प्लॅनमध्ये, तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 मेसेज आणि Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

Jio च्या 179 प्लॅनमध्ये तुम्हाला 24 दिवसांची वैधता आणि 1GB डेटा दररोज दिला जातो. त्याचप्रमाणे, 209 च्या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी दररोज 1 GB डेटा मिळतो. या दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 मेसेज आणि Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

हेही वाचा: ''..तर मी नाही म्हणणार नाही"; संघटनांवर बंदीबाबत शरद पवारांचे विधान

एअरटेलचे प्लॅन

Airtel सुद्धा 1GB डेटा प्रतिदिन अनेक प्लॅन ऑफर करते. यादीतील पहिला प्लॅन 209 रुपयांचा आहे आणि 21 दिवसांच्या वैधतेसह प्रतिदिन 1 GB डेटा ऑफर करतो. हा प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 एसएमएस प्रतिदिन सह येतो.

दुसरा प्लॅन 239 रुपयांचा प्लॅन आहे, जो 24 दिवसांच्या वैधतेसह प्रतिदिन 1GB डेटा ऑफर करतो. यासोबत अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि 100 एसएमएस प्रतिदिन दिले जातात. त्याचप्रमाणे 265 रुपयांचा प्लॅनही आहे. अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 SMS सह 28 दिवसांसाठी 1GB/दिवस डेटा मिळतो. या सर्व प्लॅनमध्ये तुम्हाला विंक म्युझिकच्या एक्सेससह Amazon Prime Video Mobile Edition ची फ्रि ट्रायल देखील देतात.

हेही वाचा: नारायण राणेंच्या बंगल्यावर हातोडा पडणार?; BMC कडून १५ दिवसांची मुदत

Web Title: Affordable Jio And Airtel Daily 1 Gb Data Plan With Unlimited Calling

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JioAirtelPrepaid Plan