JioPhone ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त प्लॅन, 75 रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाही

सकाळ ऑनलाइन टीम
Sunday, 10 January 2021

आता इंटरकनेक्ट चार्ज संपुष्टात आल्यानंतर JioPhone यूजर्सला या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळेल. 

नवी दिल्ली- Jio फोन 2017 मध्ये लाँच करण्यात आला होता. त्यानंतर रिलायन्स जियोचे सबस्क्रायबर वेगाने वाढले. 2019च्या अखेरीपर्यंत जियो फोन सबस्क्रायबर बेस 7 कोटींपर्यंत पोहोचला. जियो फोन यूजर्सला सर्वात स्वस्त (75 रुपये) 4G टेरिफ प्लॅन ऑफर केला आहे.  आधी जियोचा 28 दिवसांचा व्हॅलिडिटी प्लॅन 49 रुपयांत जियो फोनसाठी ऑफर करण्यात आला होता. परंतु, नंतर कंपनीने याचे दर वाढवले आणि या प्लॅनची किंमत 75 रुपये करण्यात आली आहे. आता इंटरकनेक्ट चार्ज संपुष्टात आल्यानंतर JioPhone यूजर्सला या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळेल. 

जियोफोन यूजर्सला सध्या  'All in One' अंतर्गत अनलिमिटेड कॉम्बो प्लॅन ऑफर केले जातात. त्याची किंमत 75 रुपयांपासून सुरु होऊन 185 रुपयांपर्यंत आहे. 75 रुपयांच्या जियो फोन All-in-one-plan बाबत बोलायचं म्हटलं तर त्याची व्हॅलिडिटी 28 दिवस आहे. यामध्ये देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एमबी डेटा आणि 50 एसएमएस ऑफर केले जातात. 

हेही वाचा- कसा आणि कुठून आला बर्ड फ्लू? भारतात काय आहे धोका?

त्याचबरोबर या लिस्टमध्ये 125 रुपयांच्या प्लॅनचाही समावेश आहे. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 500 एमबी डेटा, 300 एसएमएस आणि 28 दिवसांची व्हॅलिडिटी असेल. 155 रुपयांच्या जियोफोन प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस मिळतील. त्याची व्हॅलिडिटी 28 दिवस आहे. तर 185 रुपयांच्या जियोफोन प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा दररोज, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएस सारख्या सुविधा मिळतात. विशेष म्हणजे जियोफोन प्लॅनमध्ये जियो ऍप्स, जियो टिव्ही आणि जियो सिनेमाचे ऍक्सेस फ्रीमध्ये मिळते. 

हेही वाचा- ती म्हणाली, खून करून ये माझ्याजवळ; मोबाईलवरच्या मेसेजने पोलिसांना बसला धक्काच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jiophone Plans Offering Unlimited Calling At Rs 75