वारंवार चार्जिंगची चिंता विसरा! 'ही' इलेक्ट्रिक बाईक एका चार्जमध्ये देते तब्बल ३४४ किलोमीटरची रेंज, स्पीडही भन्नाट

या गाडीचा टॉप स्पीड हा १८८ किलोमीटर प्रतितास असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
KM5000
KM5000Esakal

इलेक्ट्रिक बाईक घेण्याचा विचार करत असताना, सर्वात आधी आपण तिच्या रेंजचा विचार करतो. देशात अजूनही पुरेशा प्रमाणात चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध नसल्यामुळे, गाडी एका चार्जमध्ये किती किलोमीटर जाते हे पाहणं खूप गरजेचं ठरतं. कित्येक लोक तर केवळ चांगली रेंज नाही म्हणून इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike) घेण्याचं टाळतात. तुम्हीदेखील याच कारणामुळे थांबला असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

कबीरा मोबिलिटी या इलेक्ट्रिक बाईक बनवणाऱ्या कंपनीने आपली नवीन बाईक लाँच केली आहे. KM5000 नाव असलेल्या या इलेक्ट्रिक बाईकची खासियत म्हणजे, एका चार्जमध्ये ही बाईक तब्बल ३४४ किलोमीटर धावेल असा दावा कंपनीने केला आहे. पुढच्या वर्षीपासून या गाडीची (Kabira KM5000) डिलिव्हरी करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

KM5000
Bike Evolution: डिझेलवर डुरडुरणाऱ्या फटफटी आता इलेक्ट्रिक झाल्या! असा होता भारतात बाईक्सचा प्रवास

स्पीडही भन्नाट

इलेक्ट्रिक गाड्यांना चांगला पिकअप किंवा स्पीड नसतो अशी तक्रार बरेच जण करतात. मात्र, ही गाडी इतर इलेक्ट्रिक बाईक्सपेक्षा भरपूर वेगळी आहे. या गाडीचा टॉप स्पीड हा १८८ किलोमीटर प्रतितास असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

या गाडीला मिडनाईट ग्रे, डीप खाकी आणि एक्वामरीन अशा तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असणार आहे. यावर्षी ही गाडी लाँच करण्यात येईल, तर डिलीव्हरी पुढच्या वर्षीपासून सुरू होणार आहे.

KM5000
Karizma, Avenger आणि Yamaha R3 बाईक नव्याने मारणार एंट्री

कबीराची ही दुचाकी परफॉर्मन्स आणि सुरक्षेच्या बाबतीत इतर पेट्रोल इंजिन असणाऱ्या दुचाकींप्रमाणेच आहे, असा दावा कंपनीचे सीईओ जयबीर सिवाच यांनी केला आहे. दरम्यान, दमदार मायलेज (Electric Bike with 344 km range) असणाऱ्या या बाईकमध्ये कोणती बॅटरी वापरण्यात आली आहे याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

किंमतही जास्तच

टॉप रेंज आणि टॉप स्पीड असणाऱ्या या गाडीची किंमतही तशीच आहे. KM5000 या इलेक्ट्रिक बाईकची एक्स शोरूम प्राईज ही 3,15,000 रुपये आहे. या किंमतीत पेट्रोल इंजिन असणाऱ्या ३५० सीसी क्षमतेच्या गाड्या उपलब्ध होतात. त्यामुळे, पेट्रोलऐवजी इलेक्ट्रिक गाडी घेण्याकडे ग्राहकांना वळवणे कंपनीसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

KM5000
Electric Cars : भारतातील सर्वात स्वस्त टॉप ५ इलेक्ट्रिक कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com