

2026 Kia Seltos India, New Kia Seltos Launch, Seltos Facelift
esakal
Kia Seltos 2026 : किआ इंडियाने आपली लोकप्रिय मिडसाइज SUV सेल्टॉसचे दुसऱ्या जनरेशनचे मॉडेल भारतात ओपन केले आहे. नवीन किआ सेल्टॉसची (Kia Seltos) किंमत 2 जानेवारी 2026 ला जाहीर होईल, तर बुकिंग आजपासूनच (11 डिसेंबर) सुरू झाले आहे. डिलिव्हरी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होईल. 25000 रुपये टोकन देऊन तुम्ही ही गाडी बुक करू शकता
पाच वर्षांनंतर आलेल्या या जनरेशन चेंजमध्ये किआने डिझाइन, प्लॅटफॉर्म, साइज, इंटीरियर आणि फीचर्समध्ये मोठे बदल केले आहेत. चला तर मग या पाच सर्वात महत्त्वाच्या बदलांचा थोडक्यात जणून घेऊया.