Air Conditioner Myths: AC बद्दल तुमचे देखील आहेत हे गैरसमज? मग या गोष्टी घ्या जाणून

नवा एसी घ्यायचं ठरलं की मित्र परिवारात एसीची माहिती घेण्यासाठी आपण विचारपूस सुरु करतो. यात अनेकदा अशा गोष्टी समोर येतात की ज्यामुळे आपण एसी घ्यावा की नाही या विचारात पडतो.
Air Conditioner Myths
Air Conditioner MythsEsakal

Air Conditioner Myths: उन्हाचा तडाखा वाढू लागला की पावसाळा आणि हिवाळ्यात आराम करणारे एसी म्हणजे एअर कंडिशनर पुन्हा सुरू होतात. घराबाहेर रखरखतं ऊन असताना लोकं घरात खिडक्या दार बंद करून घर गारेगार ठेवण्यासाठी मग एसी लावतात.

तर उन्हाळा सुरू होताच ज्यांच्याकडे एसी नाही असे अनेक लोक गरमी वाढू लागली की लगेचच घरात एसी घेण्याचे प्लान आखू लागतात. Know about the misconceptions about Air Conditioner

नवा एसी घ्यायचं ठरलं की मित्र परिवारात एसीची Air Conditioner माहिती घेण्यासाठी आपण विचारपूस सुरु करतो. यात अनेकदा अशा गोष्टी समोर येतात की ज्यामुळे आपण एसी घ्यावा की नाही या विचारात पडतो.

एसी वारंवार बिघडू शकतो किंवा एसीमुळे आजारी Ailment पडण्याची शक्यता असते अशा गोष्टी कानांवर पडू लागतात. 

एसी संबंधी अशा अनेक गोष्टी गेल्या अनेक वर्षांपासून लोकांमध्ये अफवा निर्माण करत आहेत. यातील अनेक गोष्टींमध्ये कसलंच तथ्य नाही . एसीबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. अशाच एसी बद्दलच्या लोकांमध्ये असलेल्या काही गैरसमजांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

AC ची सर्विसिंग- अनेकजण एसीची वेळेवेळी सर्विसिंग करणं गरजेचं समजत नाहीत.  सर्विसिंग केली नाही तरी एसीच्या कार्यक्षमतेवर काही परिणाम होत नाही या विचाराने सर्विसिंगकडे दुर्लक्ष केलं जातं.  एसी नीट काम करतोय तर सर्विसिंगची  आवश्यकता कशाला असं म्हणत सर्विसिंग टाळतात.

मात्र जर तुम्ही देखील असं करत असाल तर एक गोष्ट लक्षात घेणं गरजेची आहे. एसीचं वेळोवेळी मेंटेनेन्स न झाल्यास एअर कंडीशनर खूप लवकर बिघण्याची शक्यता असते. सर्व्हिसिंग न केल्यास हळू हळू एसीच्या एफिशिअन्सी Eficiencty म्हणजेच कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो. त्यामुळे किमान उन्हाळ्याचा सिझन सुरू होण्यापूर्वी एकदा तरी ACची सर्विसिंग करून घेणं गरजेचं आहे. 

AC आउटडोर युनिट- अनेकदा एसीचं आयुटडोर युनिट अशा जागी बसवलं जातं जिथे ते इन्स्टॉल करणं सोप असेल. किंवा आपल्या सोयीनुसार आपण या युनिटसाठी जागा निवडतो.

मात्र या आयुटडोर युनिटची जागा योग्य नसेल तरीही ACच्या एफिशिएंसीवर परिणाम होवू शकतो आणि एसीमध्ये लवकर बिघाड होवू शकतो. यासाठी आयुटडोर युनिट सावलीच्या ठिकाणी लावण्याचा सल्ला दिला जातो. 

हे देखिल वाचा-

Air Conditioner Myths
AC Care : तुम्हीही AC ऑपरेट करताना ही चूक करता का? वेळीच व्हा सावध नाहीतर होऊ शकतो मोठा स्फोट

समर फ्लू बद्दलचा गैरसमज- ACमध्ये जास्त वेळ बसल्याने सर्दी खोकला होण्याचा धोका वाढतो असा अनेकांचा समज असतो. मात्र हा एक गैरसमज आहे. ताप किंवा सर्दीसाठी एअर कंडीशनर जबाबदार नसून बॅक्टेरिटा, व्हायरस आणि जर्म्समुळे आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. 

टेंप्रेचर कमी केल्याने फास्ट कुलिंग शक्य- AC सुरु करताच जर एसीचं तापमान Temperature अगदी कमी केलं तर जलद कुलिंग होते असा अनेकांचा समज असतो. AC सुरु करताच लगेच थंडावा असल्याने थर्मोसट १६ सेल्सियसवर सेट केला जातो. प्रत्यत्रात एसीचं टेंप्रेचर जास्त असेल तरी कुलिंग हे होतचं. 

AC फिल्टर स्वच्छ राहण्यासाठी घर स्वच्छ ठेवणं- एसीची कुलिंग करण्याची कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी नियमितपणे एअर फिल्टर साफ करणं किंवा बदलणं गरजेचं असतं. तुम्ही कुठे राहता आणि तुमचा एसीचा वापर किती आहे यावर एअर फिल्टर किती वेळा साफ करावा किंवा बदलणं गरजेचं आहे हे ठरत असतं.

एअर फिल्टर खराब असल्यास त्याचा परिणाम तुमच्या एसीच्या कुलिंगवर तसचं वीज वापरावर होवू शकतो. त्यामुळे केवळ घर साफ ठेवल्याने एअर फिल्टर स्वच्छ राहिल हा गैरसमज आहे. एसीच्या वापरावर एअर फिल्टरची स्वच्छता अवलंबून असतं. 

जेवढा AC मोठा तेवढा उत्तम- AC आकाराने जेवढा मोठा तेवढा उत्तम हा एक गैरसमज आहे. लहान एसीदेखील घर किंवा तुमची खोली थंड करू शकतं. मोठ्या एसीमुळे जरी कुलिंग फास्ट होत असेल याचा अर्थ तिची कार्यक्षमता लहान एसीपेक्षा उत्तम आहे असं नव्हे.

तर तुमच्या खोलीच्या किंवा घराच्या आकार किंवा तो किती मोठा आहे यावर एसीचा आकार अबलंबून असतो. तुमच्या खोलीनुसार योग्य टनाचा एसी बसवणं कधीही योग्य. 

AC फक्त उन्हाळ्यासाठी- AC चा वापर फक्त उन्हाळ्यासाठी असतो हा एक मोठा गैरसमज आहे. अलिकडे बाजारात असलेल्या एसीमध्ये अॅडव्हान्स मोड आहेत. ज्यात ऋतूनुसार तापपान नियंत्रित करण्याची क्षमता असते. पावसाळ्याच्या दिवसात हे एसी हवेतील अतिरिक्त आर्द्रता काढून टाकण्यास मदत करतं. 

त्यामुळे एसी खरेदी करण्यापूर्वी कोणत्याही गैरसमजांना बळी पडू नका. शोरुममध्ये जाऊन जाणकारांकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या एसीची माहिती घ्या. तसचं अलिकडे यूट्यूबवरील काही चांगल्या रिव्ह्यूची देखील तुम्हाला यासाठी मदत होवू शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com