Sleep Management रात्री झोपण्यापूर्वी ही चूक अजिबात करू नका, नाहीतर पडाल आजारी

पुरेशी झोप घेण्यासाठी झोपेचं योग्य वेळापत्रक असणं गरजेंचं आहे. बदललेल्या जीवनशैलीत आपण अशा अनेक चुका करतो ज्यामुळे झोपेचं हे वेळापत्रक बिघडतं आणि पुरेशी झोप होत नाही
झोपेचे व्यवस्थापन
झोपेचे व्यवस्थापनEsakal

निरोगी राहण्यासाठी ज्याप्रमाणे पोषक आहार गरजेचा आहे त्याचप्रमाणे पुरेशी आणि शांत झोप ही अत्यंत गरजेची आहे. पुरेशी झोप न मिळाल्यास आरोग्याशी निगडीत अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र सध्याच्या धावपळीच्या जगात अनेक जण झोपेकडे तसचं झोपेच्या वेळांकडे दूर्लक्ष करतात. Sleep Management Tips in Marathi Healthy Sleeping Habits

तुम्ही फिट असाल तर कोणतही काम करताना एनर्जी राहते. मात्र फिट राहण्यासाठी किमान ७-८ तासांची झोप Sleep महत्वाची आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे Life Style अनेकांना झोप न लागण्याची समस्या निर्माण  झाली आहे. आरोग्यासाठी हे हानिकारक आहे. 

पुरेशी झोप घेण्यासाठी झोपेचं योग्य वेळापत्रक असणं गरजेंचं आहे. बदललेल्या जीवनशैलीत आपण अशा अनेक चुका करतो ज्यामुळे झोपेचं हे वेळापत्रक बिघडतं आणि पुरेशी झोप होत नाही. तसचं रात्रीच्या झोपण्यापूर्वीच्या आपल्या काही सवयी आपल्या झोपेवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम करत असतात. त्यामुळे या सवयी बदलणं गरजेचं आहे. या सवयी बदलल्यास शांत झोप लागेल परिणामी आरोग्यही चांगलं राहील. 

रात्री उशीरापर्यंत टीव्ही आणि मोबाईलचा वापर

आजकाल झोपण्यापूर्वी प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर करतच. मग तो मोबाईल असो किंवा टीव्ही. रात्री उशीरा पर्यंत मोबाईल आणि टीव्ही पाहिल्याने त्याचा थेट परिणाम तुमच्या डोळ्यांवर आणि मेंदूवर होत असतो. हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. अनेकजण खोलीतील लाईट बंद करून मोबाईल किंवा टीव्ही पाहतात. यामुळे डोळ्यांवर अधिक ताण येऊन त्याचा दृष्टीवरही परिणाम होतो. 

रात्रीचा जड आहार

रात्री उशीरा झोपण्यापूर्वी हेवी म्हणजे जह आहार घेणं टाळलं पाहिजे. रात्री उशीरा आहारात जड पदार्थ खाल्ल्यास अपचन आणि गॅस सारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे शातं झोप लागण्यास अडचणी होते. त्यामुळे जर तुम्ही रात्री उशिरा जेवत असाल तर पचनास हलके पदार्थ खा. तसचं बऱ्याचदा जागरणामुळे भूक लागते. अशावेळी जंक फूड खाल्ल्याने रात्री ते पचण्यास योग्य नसल्याने वजन वाढते आणि पोटासंबधीच्या इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

हे देखिल पहा-

झोपेचे व्यवस्थापन
Sleeping Tips : तुमची झोप पुर्ण न होण्याला ही गोष्ट ठरते जास्त कारणीभूत

झोप येण्यासाठी अल्कोहोल

अनेकजण चांगली झोप लागण्यासाठी अल्कोहोलची मदत घेतात. दारू किंवा वाईन प्यायल्याने चांगली झोप येईल असा त्यांचा समज असतो. मात्र यामुळे दारूचं व्यसन जडण्याची शक्यता वाढते. जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

जास्त पाणी पिऊ नये

पाणी हे शरीरासाठी गरजेंचं असलं तरी रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी प्यायल्याने तुम्हाला वारंवार बाथरुमला उठावं लागू शकतं. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी ३ तास आधीपासूनच पाण्याचं तसचं पातळ पदार्थांचं सेवन कमी करावं. शिवाय रात्री अधिक पाणी पिऊन झोपल्यास किडनीवरही त्याचा परिणाम होवू शकतो. 

रात्री चहा पिणे

चहामध्ये कॅफेनचं प्रमाण असतं. यामुळे तुमचा मेंदू सतर्क आणि सक्रिय राहण्यास मदत होते यामुळे रात्री लवकर झोप लागत नाही. त्याएवजी झोपण्यापूर्वी जायफळयुक्त कोमट दूध पिणं जास्त फायदेशीर ठरू शकतं. यामुळे शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत होईल.

या सवयींचा तुमच्या झोपेवर परिणाम होतो. पुरेशी झोप न झाल्याने आरोग्यही बिघडतं. याउलट वेळेत झोप लागण्यासाठी तुम्ही वाचनाचा पर्याय निवडू शकता. मोबाईल एवजी वाचन केल्याने झोप लागण्यास मदत होते. तसचं काही वेळ डोळे मिटून मेडिटेशन केल्यासही शांत झोप लागण्यास मदत होवू शकते. रात्री थोडफार लिखाण केल्यासही झोप लागण्यास मदत होईल. 

योग्य आहारासोबतच पुरेशी झोप झाल्यास आरोग्याच्या समस्या दूर होतील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com