AC Care : तुम्हीही AC ऑपरेट करताना ही चूक करता का? वेळीच व्हा सावध नाहीतर होऊ शकतो मोठा स्फोट

आज आम्ही तुम्हाला एसी मुळे होणाऱ्या घटनांपासून सावध कसे राहावे ते जाणून घेऊया
AC Care
AC Careesakal

AC Care Tips : उन्हाळ्यात उकाळ्यामुळे जवळपास प्रत्येक मध्यमवर्गीय घरात एअर कंडिशनर हा लागतोच. अतिउष्णतेमुळे ती काळाची गरज बनते. उकाळ्याच्या वातावरणात एसी तुम्हाला आरामदायी हवा देते. एसी ऑपरेट करणे अनेकांना फार सोपे वाटत असले तरी ऑपरेट करताना तुम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर तुमच्यासाठी ते फार धोकादायक ठरू शकते. खरंतर एअर कंडिशनर मध्ये सुद्धा स्फोट होऊ शकतो. मात्र अनेक लोकांना याबाबत कल्पना नसते, आज आम्ही तुम्हाला एसी मुळे होणाऱ्या घटनांपासून सावध कसे राहावे ते जाणून घेऊया.

AC Care
Air Conditioner : उन्हाळा सुरू झालाय! घरात ठेवा हा छोटा फॅन

एअर कंडिशनरमुळेही होऊ शकतो स्फोट

एअर कंडिशनर वापरताना तुम्ही केलेल्या निष्काळजीपणामुळे मोठा स्फोट होऊ शकतो. हे विशेषतः विंडो एअर कंडिशनर्सच्या बाबतीत घडते आणि याचे कारण असे की ते एकाच युनिटमध्ये येते आणि सर्व पार्ट्स एकत्र असतात. त्यात असे काही भाग देखील आहेत जे अतिसंवेदनशील आहेत आणि त्यात काही फॉल्ट असल्यास ते वेळीच दुरुस्त केले नाही तर ते एअर कंडिशनरमध्ये स्फोटाचे कारण बनू शकतात.

एअर कंडिशनरमध्ये एक काँप्रेसर असतो ज्याद्वारे कूलिंग प्रक्रिया होते ज्यात कूलिंग प्रोसेस असते. ज्यामुळे एअर कंडिशनर चांगल्या प्रकारे कार्य करते. जर कूलंटचे प्रेशर योग्य नसेल आणि काँप्रेसरमध्ये कोणत्याही प्रकारची गळती असेल तर त्यामुळे स्फोट होऊ शकतो. बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात परंतु ते करणे योग्य नाही. ते एसी वेळोवेळी तपासली पाहिजे जेणेकरुन ते वेळीच सुधारता येईल. (Summer)

AC Care
AC खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या या 5 गोष्टी, नाहीतर...

एसीला सुरक्षित कसे ठेवाल?

तुम्ही तुमचे एअर कंडिशनर नियमित सर्व्हिसिंगद्वारे व्यवस्थित ठेवू शकता जेणेकरून त्यात पुन्हा काही अडचणी येणार नाहीत. जर तुम्ही एअर कंडिशनरची सर्व्हिसिंग करून घेत असाल तर पैसे वाचवण्यासाठी ते कोणत्याही मेकॅनिककडून दुरुस्त करून घेऊ नका, तर कंपनीकडूनच सर्व्हिसिंग करून घ्या, जेणेकरून सर्व्हिसिंग व्यवस्थित होईल आणि त्यात कोणतीही अडचण येणार नाही. एअर कंडिशनरची सर्व्हिस केल्यावरच ते नेहमी सुरू करा किंवा बंद करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com