Samsung Galaxy M12 : 7000mAh बॅटरी, रिअर कॅमेरासह हे आहेत जबरदस्त फिचर्स

samsung
samsung

नवी दिल्ली : Samsung Galaxy M12 बाबत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बातमी येत आहे. या फोनला वेगवेगळ्या सर्टीफिकेशन वेबसाईट्सवर पाहिलं गेलंय. याशिवाय वाय-फाय अलायन्स लिस्टींगमधून हँडसेटच्या लवकरच लाँच होण्याची माहितीही मिळते. Samsung Galaxy M12 ला मॉडल नंबर SM-M12FG/DS आणि SM-F12G/DS च्या सोबत पाहिलं गेलंय. MySmartPrice च्या रिपोर्टमध्ये सांगितलं गेलंय की, SM-F12G मॉडल नंबर म्हणजे फोनचे F-व्हर्जन असू शकते. लिस्टींगमधून खुलासा होतो की, सॅमसंग गॅलेक्सी एम-12 एँड्रॉईड 11 वर चालेल. 

याआधी आलेल्या बातम्यांनुसार, सॅमसंग गॅलक्सी एम 12 मध्ये 7000mAh बॅटरी असू शकते. फोनमध्ये रिअरवर ड्यूअल टेक्स्चर फिनिश दिली जाणार आहे. या फोनमध्ये मल्टीपल सेंसरसोबत स्क्वायर कॅमेरा मॉड्यूल असेल. फोनच्या डीझाइनवरुन बातम्या आहेत की, तो गॅलक्सी ए42 सारखा दिसेल. स्पेसिफिकेशन्स बाबतीत  बोलायचं झालं तर येणाऱ्या सॅमसंग गॅलक्सी एम12 मध्ये 6.5 इंच डिस्प्ले असेल. फोनमध्ये 4 GB रॅमसोबतच एक्सीनॉस 9611 ऑक्टा-कोअर प्रोससर लेंस असेल. सॅमसंग गॅलक्सी एम 12 मध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी, 8 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल सेंसरसोबतच ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो. सेल्फीसाठी हँडसेटमध्ये 16 मेगापिक्सेल कॅमेरा दिला जाईल. 

बातम्यांमध्ये दावा केला गेलाय की हँडसेटचे डायमेंशन 163.9 x 75.9 x 8.9 मिलीमीटर असेल. फोनला रिअर प्लास्टिक बॉडी असेल. हँडसेटमध्ये कडेला फिंगरप्रिंट सेन्सर असेल. याशिवाय सॅमसंग 6000mAh बॅटरीवाल्या गॅलक्सी एम 42 वरदेखील काम करत आहे. या फोनमध्ये रिअरवर 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि 128 GB इनबिल्ट स्टोरेज दिली जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, सॅमसंग गॅलक्सी एण42 कंपनीच्या गॅलक्सी ए 42 5G चे लोअर व्हर्जन असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com