देशातील टॉप तीन इलेक्ट्रीक कार; 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन्स | Best Electric Cars | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric Car

देशातील टॉप तीन इलेक्ट्रीक कार; 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कोरोनापासून सामान्य माणसाचे बजेट बरेच बिघडले आहे. त्याचसोबत पेट्रेल डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांना वाहन चालवण्याआधी एकदा विचार करायला भाग पाडले आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही स्वस्त पर्याय शोधत असाल तर आज आपण काही इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुम्ही खरेदी करण्याचा विचार करू शकता.

Tata Nexon Ev

Nexon Ev ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV म्हणून ओळखली जात आहे, कारण यापेक्षा भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या सर्व इलेक्ट्रिक कार सुमारे 6 ते 7 लाख रुपयांनी महाग आहेत.

Tata Nexon EV च्या बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, यात 30.2 kWh बॅटरी मिळते, जी एका चार्जवर 300 किमी पेक्षा जास्त चालेल असा कंपनीचा दावा आहे . यासोबतच कंपनीचा दावा आहे की Nexon EV ला 15A सॉकेटने 8.5 तासात चार्ज करता येईल. त्याच वेळी, फास्ट चार्जर वापरुन त्याची बॅटरी सुमारे 60 मिनिटांत 80 टक्के चार्ज होऊ शकते.

हेही वाचा: महिंद्राची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; एका चार्जवर धावेल 140 किमी

MG ZS EV

ZS EV परदेशात विकल्या जाणाऱ्या तिच्या पेट्रोल ट्विनसारखे दिसते. ZS EV हे MG चे भारतीय बाजारपेठेतील दुसरे उत्पादन आहे. या कारचे डिझाइन लोकांना खूप आवडले आहे. ZS EV मध्ये तुम्हावा 44.5kWh लिक्विड-कूल्ड लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. या कारच्या ड्रायव्हिंग रेंजबद्दल बोलायचे झाले तर, एका चार्जवर ही 340km ची धावेल असा कंपनीचा दावा आहे, त्यामुळे सिंगल चार्जमध्ये ती Nexon EV पेक्षा थोडी जास्त चालते. ही कार केवळ 8.5 सेकंदात 100kmph चा वेग गाठते, असा कंपनीचा दावा आहे.

एMG ZS मध्ये तुम्हाला इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत. चार्जिंगबद्दल बोलताना, MG ने त्यांच्या डीलरशिपवर 50kW DC फास्ट चार्जर इंस्टॉल केले आहेत. याच्या मदतीने 50 मिनिटांत कार 80 टक्के चार्ज होऊ शकते. यासह, 7.4kW AC होम चार्जरसह पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 6 ते 8 तास लागतात.

हेही वाचा: Jio, Airtel चे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, दररोज मिळेल 3GB डेटा

Hyundai Kona

भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणारी कोना इलेक्ट्रिक ही पहिली कार होती. हे 9 जुलै 2019 रोजी भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली होती. दरम्यान Hyundai Kona EV ला 39.2-kWh-तास लिथियम-आयन पॉलिमर बॅटरी मिळते, जी Hyundai च्या म्हणण्यानुसार सिंगल चार्जमध्ये सुमारे 452 किमीची धावते . या कारमध्ये चार ड्रायव्हिंग मोड इको+, इको, कम्फर्ट आणि स्पोर्ट दिले आहेत. फास्ट चार्जिंगद्वारे Kona EV पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 30 मिनिटे लागतात. कोना इलेक्ट्रिक दोन व्हेरियंटमध्ये येते. याशिवाय, यात 8.0-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली जाईल, जी स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ऑटो-हेडलॅम्प, रेन सेन्सिंग वायपर्स आणि इत्यादींसह उपलब्ध आहे.

loading image
go to top