esakal | आता तुमच्या नवजात बालकांचंही बनणार आधार कार्ड; जाणून घ्या महत्वाची माहिती 

बोलून बातमी शोधा

aadhar }

तुमच्या लहान नवजात बालकांचंही आधार कार्ड बनवून घेता येऊ शकतं हे तुम्हाला माहिती आहे का? हो हे खरंय. आज आम्ही याचबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत.  

आता तुमच्या नवजात बालकांचंही बनणार आधार कार्ड; जाणून घ्या महत्वाची माहिती 
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : आधार कार्ड ही आपल्या जीवनातील सर्वाधिक कामाची वस्तू म्हणता येईल. बँकेची कामं, दाखला, महागडी वस्तू विकत घेणं ही सर्व कामं आधार कार्डशिवाय होऊ शकत नाहीत. मात्र तुमच्या लहान नवजात बालकांचंही आधार कार्ड बनवून घेता येऊ शकतं हे तुम्हाला माहिती आहे का? हो हे खरंय. आज आम्ही याचबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत.  

आता तुम्ही तुमच्या नवजात बाळाचंही आधार कार्ड तयार करू शकता. UIDAI आतापर्यंत ५ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या लहान मुलांचं आधार कार्ड बनवत होतं. या आधार कार्डला 'बाल आधार कार्ड' म्हणतात. 

हेही वाचा - महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजप नेता आणि सामाजिक कार्यकर्ता फरार; आरोपींचा शोध सुरु 

मात्र आता तुम्ही तुमच्या नवजात बाळाचंही आधार कार्ड बनवू शकणार आहात. UIDAIनं स्वतः ट्विट करून ही बातमी दिली आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या नवजात शिशुचा जन्मदाखला लागणार आहे. याशिवाय बाळाच्या आई-वडिलांचं आधार कार्डसुद्धा अनिवार्य असणार आहे. 

सर्वात महत्वाची बाब म्हणजे काही रुग्णालयांमध्ये नवजात बालकांचं आधार तयार करण्यात येतं. जन्मदाखला आणि आई- वडिलांचं आधार कार्ड घेऊन बाळाचं आधार कार्ड तयार केलं जातं. मर्या प्रक्रियेत बाळाचं बायोमेट्रिक केलं जात नाही कारण कालांतरानं ते बदलण्याची शक्यता असते. 

हेही वाचा - पत्नीवर हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न; घर नावे करून देण्याचा तगादा

असं तयार करा बाळाचं आधार कार्ड 

सुरुवातीला UIDAI ची ऑफिशियल वेबसाईट ओपन करा. 
यानंतर आधार रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. 
अप्लाय फॉर्ममध्ये तुमच्या नवजात शिशूचं नाव टाईप करा. 
यानंतर आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाईप करा. 
यानंतर तुम्हाला आधार सेंटरला जाण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. 
आधार सेंटरला जाऊन आवश्यक ती कागदपत्रं जमा करा. 
एकदा तुमची कागदपत्रं व्हेरिफाय झाली की तुमच्या बाळाचं आधार कार्ड तयार होईल. 
 
संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ