पेन ड्राईव्हमधील खासगी माहिती सुरक्षित ठेवायचीये? मग कुठल्याही सॉफ्टवेअरशिवाय असा सेट करा पासवर्ड 

Know how to set password for pen drive in simple steps
Know how to set password for pen drive in simple steps

नागपूर : आपली महत्वाची कागदपत्रं, आपले काही खासगी फोटो, व्हिडीओ तसंच आपल्या कंपनीचे काही खासगी डॉक्युमेंट्स आपण नेहमीच एका पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह करून ठेवतो. पेन ड्राइव्हमध्ये सेव्ह केल्यामुळे आपल्याला ते नेहमी स्वतःजवळ बाळगता येतात. मात्र आपलं पेन ड्राईव्ह हरवलं तर त्यातील माहिती ही कुठल्या विघ्नसंतोषी व्यक्तीच्या हातात लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तुमच्या पेन ड्राईव्हला सुरक्षा असणं आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तुमच्या पेन ड्राईव्हला कुठल्याही सॉफ्टवेअरशिवाय पासवर्ड सेट करण्याच्या काही सोपी स्टेप्स सांगणार आहोत.  

पेन ड्राईव्हला पासवर्ड लावण्यासाठी हे करा 

सुरुवातीला तुमचं पेन ड्राईव्ह डेस्कटॉप किंवा लॅपटॉपला कनेक्ट करा. यानंतर राईट क्लिक करून 'Turn on BitLocker' हा पर्याय निवडा. 

आता Use Password To protect The Drive वर क्लिक करा. यानंतर पासवर्ड सेट करा आणि सेव्ह करा.

आता जोपर्यंत 'सेव्ह द की फॉर फ्युचर रेफरन्स' असं येत नाही तोपर्यंत NEXT बटणवर क्लिक करत राहा.

यांनतर तुमच्या पासवर्डचं पेन ड्राईव्हमध्ये अप्लिकेबल राहील. 

यानंतर कुठल्याही डिव्हाईसला पेन ड्राईव्ह लावल्यानंतर तुम्हाला आधी पासवर्ड विचारण्यात येईल. यामुळे तुमची खासगी माहिती अनोळखी व्यक्तींपासून सुरक्षित राहील.   

संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com