
Instagram Reels फोनमध्ये करा डाऊनलोड, ही आहे सोपी पध्दत
इंस्टाग्रामचे रील फीचर हे वापरकर्त्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. बरेच जण इंस्टाग्रामवर लहान व्हिडिओ बनवतात आणि ते इन्स्टाग्रामच्या प्लॅटफॉर्मवर शेअर करतात. रील व्हिडिओ देखील खूप पाहिले जातात. मात्र हे व्हिडिओ डाउनलोड करता येत नाहीत, कारण सध्या इन्स्टाग्रामवर त्यासाठी कोणताही डाउनलोड ऑप्शन देण्यात आलेला नाही. आज आपण एक खास ट्रीक जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टाग्राम रील सहज डाउनलोड करू शकाल.
अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी
इन्स्टाग्राम रील डाउनलोड करण्यासाठी, गुगल प्ले स्टोअर वर जा आणि इन्स्टाग्राम अॅपसाठी Video Downloader for Instagram हे अॅप इंस्टॉल करा
त्यानंतर हे अॅप उघडा आणि त्यामध्ये आयडी सेटअप करा
यानंतर, इन्स्टाग्राम अॅपवर जा आणि आपण आपल्या फोनवर डाउनलोड करायची ती रील निवडा.
हे केल्यानंतर, तीन डॉट चिन्हावर टॅप करून त्या रिलची लिंक कॉपी करा
आता Video Downloader for Instagram उघडा आणि तुम्ही कॉपी केलेली URL पेस्ट करा
हे केल्यावर तुमची इंस्टाग्राम रील डाउनलोड होईल
आता तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये जा आणि तुम्हाला इथे तो रील व्हिडिओ मिळेल
हेही वाचा: Tata Punch चे कोणते व्हेरियंट बसेल तुमच्या बजेटमध्ये? वाचा
आयओएस वापरकर्त्यांसाठी
आयओएस वापरकर्त्यांना InSaver for Instagram हे अॅप डाउनलोड करावे
डाउनलोड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अॅप उघडा आणि आयडी सेट करा
त्यानंतर इन्स्टाग्राम अॅपवर जा आणि तुम्हाला डाउनलोड करायची असलेली रील निवडा
त्यानंतर तीन डॉट चिन्हावर क्लिक करून त्या रिलची लिंक कॉपी करा
InSaver for Instagram अॅप उघडा आणि URL पेस्ट करा
हे केल्यानंतर इन्स्टाग्राम रील डाउनलोड होईल
इंस्टाग्रामने मागील वर्षी जुलै महिन्यात इंस्टाग्राम रिल हे फीचर लॉंच केले होते. हे फीचर वापरुन वापरकर्ते 60-सेकंदांचे व्हिडिओ तयार करू शकतात आणि ते त्यांच्या फॉलोवर्स सोबत शेअर करू शकतात. यामध्ये युजर्सना व्हिडीओ एडिट करण्याचा पर्यायही मिळतो.
हेही वाचा: टेलिग्राम व्हॉट्सअॅपला मागे टाकणार? ओलांडला 1 अब्ज डाऊनलोडचा टप्पा
Web Title: Know How To Download Instagram Reels In Your Mobile Follow These Tips
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..