Instagram वर १००० फॉलोअर्स असतील तर पैसे कमवण्याची ही संधी अजिबात सोडू नका

How to Make Money Online: इंन्स्टाग्रामवर ज्यांचे केवळ १०००-१२०० फॉलोअर्स आहेत आणि त्यांच्या पोस्टही काही हजार लोकच पाहतात. त्यांना कोणतही ब्रॅण्ड एड देत नाहीत. शिवाय इन्स्टाग्रामच्या बोनस प्लॅनचाही अशांना फायदा होत नाही. अशा लोकांसाठी आता एक सोशल करन्सी पेमेंट कार्ड हा पर्याय सुरु झाला आहे
How to Make Money Online
How to Make Money OnlineEsakal

How to Make Money Online: सोशल मीडिया हे सध्या कमाईचं एक नवं साधन निर्माण झालं आहे. अनेकजण आपलं पूर्णवेळ कमाईचं साधन म्हणून सोशल मीडियावर Social Media वेगवेगळे प्रयोग करत आहेत.

व्लॉग आणि रिल्सच्या माध्यामातून आता अगदी लहान मुलांपासून ते तरुण, गृहीणी आणि अगदी वयोवृद्ध देखील घरबसल्या पैसा कमावू लागले आहेत. मात्र अर्थातच यासाठी तुमच्या फॉलोअर्सची Followers संख्या किंवा तुमचे Views जास्त असणं गरजेचं आहे. Know How To Earn Money Through Instagram WYLD

अलिकडे अनेकजण आपला दिवस इन्स्टाग्रामवरील Instagram रिल्स पाहण्यात तर काही जण हे रिल्स Reels बनवण्यात घालवतं आहेत. लाखांमध्ये फॉलोअर्ल असलेल्या सोशल मीडिया क्रिएटर्सना Social Media Creators या इन्स्ट्राग्रामवरील व्हिडीओजमधून चांगली कमाई मिळतेय.

मात्र त्याचं काय ज्यांनी मोठ्या उत्साहाने या प्लॅटफॉर्मवर कंटेट क्रिएटर म्हणून उडी तर घेतली. मात्र फॉलोअर्स जमवण्यात त्यांना यश आलं नाही. काही हजारांमध्येच त्यांचे फॉलोअर्स आहेत. 

इंन्स्टाग्रामवर ज्यांचे केवळ १०००-१२०० फॉलोअर्स आहेत आणि त्यांच्या पोस्टही काही हजार लोकच पाहतात. त्यांना कोणतही ब्रॅण्ड एड देत नाहीत.

शिवाय इन्स्टाग्रामच्या बोनस प्लॅनचाही अशांना फायदा होत नाही. अशा लोकांसाठी आता एक सोशल करन्सी पेमेंट कार्ड हा पर्याय सुरु झाला आहे. याचं नाव WYLD असं असून या माध्यमातून आता कमी फॉलोअर्स असलेल्यांनाही पैसे कमवणं शक्य आहे. 

हे पेमेंट कार्ड विजा पावर्ड आहे आणि याचा फायदा घेण्यासाठी इन्स्टाग्रामवर तुमचे कमीत कमी १००० फॉलोअर्स असणं गरजेचं आहे. सध्या हे इनव्हाइट बेसिसवर असून टेस्टिंग फेजमध्ये आहे.

याच्या अल्फा फेजमध्ये मुंबईतील ५ हजार युजर्सना इनव्हाइट पाठवण्यात आलं होतं. तर पुढील बीटा फेजमध्ये १० हजार युजर्संना इनव्हाइट पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्हालाही हे इनव्हाइट येतंय तर ही संधी गमावू नका. 

हे देखिल वाचा-

How to Make Money Online
Instagram Business : इंस्टाग्रामवर बिजनेस कसा सुरु कराल? या काही सोप्या टिप्स कामी येतील

कसं मिळेल WYLD कार्ड

WYLD ही एक फिनटेक आणि मार्केटिंग कंपनी आहे. म्हणजेच ही कंपनी टेक्नॉलजीच्या मदतीने फायनेंस आणि मार्केटिंग सोल्यूशन देते. ही कंपनी २०२१ सालामध्ये सुरु झाली होती.

या कंपनीच्या मते सोशल मीडियावरील साधारण युजर्सच मार्केटमधील खरे प्लेअर्स आहेत. ही कंपनी वर्ड ऑफ माउथ मार्केटिंगला डिजिटल रुप देऊन सोशल मीडियावरील साधारण युजर्सला याचा फायदा मिळेल याच्या प्रयत्नात आहे. WYLD card

कंपनीनुसार जर एका युजरचे १००० किंवा त्याहून जास्त फॉलोअर्स असतील किंवा त्याचा WYLD स्कोर १०० हून जास्त असले तर तो WYLD कार्डसाठी अल्पाय करु शकतो.

WYLD स्कोर कॅल्क्युलेट करण्यासाठी कंपनी युजर्सच्या पोस्टची फ्रिक्वेंसी त्याचा रीच आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया तसचं एंगेजमेंट तपासून पाहते. या आधारावर कंपनी त्या युजरला WYLD स्कोर देते. 

WYLD कार्डने कसे मिळतील पैसे

Instagram वरून कॅशबॅक मिळविण्यासाठी, युजर्सना खरेदीच्या वेळी त्यांच्या WYLD कार्डने पैसे द्यावे लागतील. त्यानंतर त्यांना खरेदीची एखादी पोस्ट इंस्टाग्रामवर टाकावी लागेल.

या पोस्टवर ज्याप्रकारची एंगेजमेट दिसेल त्याच्या आधारावर युजर्सना ३० ते १०० टक्क्यांपर्यांत कॅशबॅक देण्यात येईल. तसचं युजरचा WYLD स्कोर किती आहे यावरदेखील कॅशबॅक किती मिळेल हे ठरू शकतं. 

मीडिया रिपोर्टनुसार WYLD ने २००हून अधिक ब्रॅण्डसोबत पार्टनरशिप केली आहे. यात रेस्टॉरंट, बार, फॅशन ब्रॅण्ड. ब्यूटी, इलेक्ट्रॉनिक आणि फूटवेअर मधील विविध ब्रॅण्ड्सचा समावेश आहे. त्यामुळे WYLD कार्डच्या मदतीने तुम्ही शॉपिंग करतेवेळी मोठी सूट आणि कॅशबॅक मिळवू शकता. cashback on instagram

इंस्टाग्रामकडे सध्या यूट्यूब प्रमाणे यूट्यूब पार्टनर प्रोग्राम नाही. यूट्यूब या प्रोग्रामच्या माध्यमातून कंटेट पोस्ट करणाऱ्या युजर्सला त्याच्या व्हूजच्या आधारावर पेमेंट करतं. इंस्टाग्रामने रील्स प्ले डील देखील बंद करण्याची घोषणा केली आहे. हा देखीलएक इनव्हाइट ओनली प्रोग्राम होता. ज्यात जास्त फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुएसर्सना त्यांच्या ओरिजनल कंटेटच्या चांगल्या रीचसाठी बोनस दिला जात होता. 

सध्या इन्स्टाग्रामवर युजर्स ब्रॅण्डसोबत डील करून पैसा कमावतात. ही एक प्रकारची सोशल मीडिया मार्केटिंगsocial media marketing किंवा इंफ्लुएंसर मार्केटिंग , influencer marketing आहे. WYLD चा नवा प्रोग्राम देखील सोशल मीडिया मार्केटिंग प्रमाणेच आहे. यात युजर फक्त एका ब्रॅण्डसोबत सलंग्न नसेल शिवाय त्याला लाखो फॉलोअर्सची आवश्यकता नसेल. 

 social media marketing how to earn money on instagram

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com