तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन सुरक्षित ठेवायचाय? हे करा उपाय

Android smartphone
Android smartphonegoogle

अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टीम ही बहुतांश स्मार्टफोनमध्ये वापरली जाते, त्यामुळे या ऑपरेटिंग सिस्टीमवर अनेक स्कॅमर्सकडून हल्ले होण्याची शक्यता असते. या दरम्यान गुगलने त्यांची ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरकर्त्यांसाठी सुरक्षित करण्यासाठी त्यामध्ये अनेक प्रायव्हसी सेटिंग्स आणि डेटा प्रोटेक्शन सेटिंग्स दिल्या आहेत. पण बऱ्याच जणांना याबद्दल माहिती नसते. तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये तुमच्या कामासंबंधी आणि आर्थिक व्यवहारांविषयी महत्वाची माहिती असू शकते. ती चोरी झाल्यास बरेच नुकसान होऊ शकते त्यामुळे तो डेटा सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी वापरकर्त्यांना काही सवयी लावून घेणे गरजेचे आहे. आज आपण Android फोन अधिक सुरक्षित करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (know how to keep secure your android smartphone article)

परमीशन मॅनेजर वापरा

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये एखादे नवीन App इंस्टॉल करत असाल तर त्या वेळी त्या अ‍ॅपला कोणत्या परमीशन्स देत आहात हे तपासून घ्या. तुमच्या फोन सेटिंग्जमध्ये permission Manager वर जा आणि सर्व अ‍ॅप्सना देण्यात आलेल्या परमीशन्स तपासून पाहा. त्यापाकू बऱ्याच अ‍ॅप्सना आपण आनावश्यक permissions दिलेल्या असतात. या सेटिंग्जमध्ये तुम्ही येथे 'Ask every time' किंवा प्रत्येकवेळी 'Deny' असाही बदल करु शकता. य़ा सेटिंग्स बदलल्याने अ‍ॅप्स किती डेटा एक्सेस करु शकतील यावर बंधने घातल्याने तुमचा पर्सनल डेटा सुरक्षित राहील.

अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअरमधूनच डाउनलोड करा

आपल्या फोनमधील वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी चुकूनही कोणी पाठवलेली APK फाइल किंवा अ‍ॅप डाऊनलोड करु नका. थर्ड पार्टी अ‍ॅप्समध्ये लिंक आणि मालवेयर असतात जे वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरु शकतात. सोबतच तुमच्या फोनला देखील नुकसान करतात. म्हणूनच नेहमी Google Play Store या अ‍ॅप स्टोअर वरून मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा. यासोबतच तुमच्या फोनमध्ये डिफॉल्ट ऑप्शन देण्यात आलेला आहे ज्याद्वारे तुम्ही कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करण्याआधी स्कॅन करु शकता ते ऑप्शन कायम ऑन ठेवा. हे ऑप्शन ऑन करण्यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जा त्यामध्ये सेक्योरिटी ऑप्शन निवडा आणि 'Google Play Protect' ऑन करा.

Install unknown app डिसेबल करा

डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये अनोळखी थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करु नका. त्यापासून बचावासाठी सरळ फोनच्या सेंटिंग्समध्ये जा आणि install unknown app हा पर्याय डिसेबल करा. यामुळे तुमच्या फोनमध्ये तुमच्या permissions खेरीज थर्ड पार्टी अ‍ॅप डाऊनलोड होणार नाहीत. या सोबतच Google Chrome वापरत असताना Google Chrome Safe Browsing हा ऑप्शन ऑन ठेवा जेणेकरुन धोकादायक वेबसाईट आणि लिंक पासून तुम्ही सुरक्षित राहाल.

App Pinning सुरु करा

जेव्हा तुमचा स्मार्टफोन तुमचा मित्र किंवा सहकारी एखादा व्हिडीओ किंवा फोटो पाहण्यासाठी घेतो तेव्हा तो देण्याआधी तुमटच्या फोनमध्ये 'App Pinning' हा फीचर सुरु करा. या फीचरमुळे फोनमध्ये फक्त त्यावेळी चालु असलेले अ‍ॅप तेवढेच दिसेल. जोपर्यंत तुम्ही ते अनपीन करत नाही तोपर्यंत दुसरे अ‍ॅप पाहाता येत नाही. यामुळे इतर कोणी तुमच्या फोनमधील माहिती चोरून पाहू शकणार नाही.

Android smartphone
Google व YouTube ची हिस्ट्री अशी लपवा; कोणीही शोधू शकणार नाही

Two factor authentication आणि Find My Device फीचर्स

बरेच लोक स्मार्टफोनमध्ये दिलेल्या सुरक्षा फीचर्सकडे दुर्लक्ष करतात. तुमच्या फोनमध्ये तुमच्या गुगल अकाउंटसाठी 'Two factor authentication' कायम ऑन ठेवा तसेच 'Find My Device' हा ऑप्शनदेखील सुरु करणे विसरु नका. या फीचरद्वारे तुम्ही तुमचा फोन हरवल्यानंतर देखील शोधू शकता. त्याही पेक्षा पेक्षा महत्वाचे म्हणजे हे फीचर वापरुन तुमच्या फोनमधीड डेटा कोणत्याही ठिकाणहून डिलीट करु शकता.

नोटिफिकेशन प्रिव्ह्यू बंद करा

जर तुम्हाला आलेला टेक्स मॅसेज कोणी पाठवला आहे. आणि त्याचा प्रिव्ह्यू इतरांना दिसू नये असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही लॉकस्क्रिनवर दिसणाऱ्या नोटिफिकेशन डिसेबल करु शकता. यासाठी तुम्हाला फोन सेटिंग्समध्ये जाऊन लॉकस्क्रिन ऑप्शन बदलावा लागेल.

वापरत नसलेले अ‍ॅप डिलीट करा

डेटा सुरक्षेसाठी वापरात नसलेले फोनमधील अ‍ॅप लवकर डिलीट करणे गरजेचे आहे. कमी वापर असलेले अ‍ॅप बऱ्याचदा अनेक दिवसांपासून अपडेट केलेले नसतात. त्यामुळे या अ‍ॅपच्या मदतीने तुमच्या फोनमध्ये मलवेयर सोडला जाऊ शकतो. यामुळे तुम्ही वापरत नसलेले अ‍ॅप तात्काळ अनइंस्टॉल करणे चांगले राहील.

Android smartphone
तुमच्या एका क्लिकवर Google कसा शोधतो माहिती? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

गरज नसेल तेव्हा वायफाय बंद करा

तुमच्याकडे फ्री वायफाय असेल तर ते कायम सुरु ठेवणे टाळा. जेव्हा तुम्ही वायफाय आणि ब्लूटूथचा वापर करत नसाल किंवा घराबाहेर जाणार असाल, तसेच झोपतेवेळी ते बंद करुन ठेवा. ही स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी चांगली सवय आहे. सुरु असलेल्या वायफाय किंवा ब्लूटूथचा वापर करुन तुमती सिस्टीम हॅक केली जाऊ शकते त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

(know how to keep secure your android smartphone article)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com