तुमचा फोन हॅकर्सपासून वाचवण्यासाठी या टिप्स करा फॉलो

जर कोणी तुमचा मोबाइल फोन हॅक केला तर मोठे संकट येऊ शकते.
phone hacking
phone hackingGoogle
Updated on

सध्या इंटरनेटशिवाय जगणे फारच अवघड झाले आहे. इंटरनेटशिवाय आजकाल कसलेच काम होत नाही. लॅपटॉप किंवा मोबाईलवर प्रत्येकजण इंटरनेट वापरतो परंतु, वाढत्या तंत्रज्ञानाचा समांतर धोका देखील मोठा आहे. कधी इंटरनेटद्वारे लॅपटॉप वरून डेटा चोरीला (Data Theft) जातो, तर कधी मोबाइल हॅक (Mobile Hacking) केला जातो. आजच्या काळात, सर्व लोकांकडे मोबाइलमध्ये महत्वाची माहिती असते. जर कोणी मोबाइल हॅक केला तर मोठे संकट येऊ शकते. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपल्या मोबाईलच्या सुरक्षिततेविषयी जागरूक असले पाहिजे. आज आपण आपला मोबाइल हॅक होण्यापासून कसा वाचवू शकता ते जाणून घेणार आहोत. (know how to protect your mobile from hacking Marathi article)

व्हेरीफाइड लिंक्सचा वापर करा..

जर आपण लक्ष दिले असेल तर आपल्याला हे समजेल की आपण मोबाइलमध्ये एखादे पेज उघडताच त्या पेजवर बऱ्याच लिंक्स दिसू लागतात. अशा अज्ञात लिंकवर क्लिक केल्यानंतर हे पेज एकदम ब्लँक होईल. यामुळे डेटा चोरी आणि मोबाईलवरून हॅकिंगचा धोका वाढतो. या अज्ञात लींकवर मोठ्या ऑफर पाहिल्यानंतर लोक क्लिक करतात आणि नंतर मोबाइल हॅक झाल्याचे समजते असे बर्‍याच वेळा पाहिले गेले आहे. म्हणून आपण व्हेरीपाइल लींक्सच उघडा.

phone hacking
भारतात पब्जी-टू होणार लॉंच? भारतीय संस्कृतीवर असणार नवी रचना !

कुकीज परवानगी देऊ नका

जेव्हा आपण मोबाईलमध्ये एखादा एप्लिकेशन इंस्टॉल करता किंवा उघडता, तेव्हा ते पेजवरून कुकीज परवानगी विचारली जाते जेव्हा तुम्ही ती परवानगी देता तेव्हा पासवर्ड मागीतला जातो ही धोक्याची घंटा असू शकते. बर्‍याच वेळा, हे एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी काही अतिरिक्त फायली देण्यात येतात ज्यामुळे मोबाईलमध्ये व्हायरस सोडले जातात. अशा परिस्थितीत कोणतेही एप्लिकेशन किंवा पेज उघडताना अशा कुकीजबद्दल लक्षात ठेवा.

फ्री वायफाय वापरणे टाळा

फ्री वायफाय ही धोक्याची घंटा असू शकते. फ्री वायफायला कनेक्ट झाल्यानंतर तुमचा फोन हॅक होण्याचा धोका वाढतो. बर्‍याच वेळा फ्री-वायफाय वापरत असताना बरेच जण अनेक गोष्टी डाउनलोड करण्यास सुरवात करतात किंवा अज्ञात लिंकवर क्लिक करतात. या प्रकरणात, हॅक होण्याची शक्यता वाढली आहे. म्हणून आपण कधीही कोणत्याही फ्री वायफाय वापरणे टाळावे.

मोबाइलसह एप्लिकेशन अपडेट करा

मोबाईलद्वारे एप्लिकेशन अपडेट न केल्याने मोबाईलमधून डेटा चोरीला गेलेला आहे किंवा एखाद्याने मोबाइल हॅक केल्याचे बर्‍याच वेळा पाहिले गेले आहे. कधीकधी मोबाइल किंवा एप्लिकेशन अपडेट करावा लागतो जेणेकरून जुन्या सिस्टममधील कोणताही तांत्रिक दोष दूर केला जाऊ शकेल. हे वेळेसह अपडेट न केल्यास, हॅकर्स सहज याचा फायदा घेतात आणि मोबाइल हॅक करतात. मोबाइल व एप्लिकेशन अपडेट केल्यावर हॅक होण्याची शक्यता कमी होते.

phone hacking
वय अवघं 13 वर्षे ! आयुष्मानने बनवली साबणाचे पाणी रिसायकल करणारी मशिन

याचीही काळजी घ्या

मोबाईलमध्ये दुसर्‍याचा पेन ड्राईव्ह लावणे किंवा वापरणे टाळा.

आपण मोबाइलमध्ये कोणताही अँटी व्हायरस देखील वापरू शकता.

इतर कोणत्याही मोबाइलवरून डेटा शेयर करताना काळजी घ्या

फोनचा पासवर्ड किंवा कोणत्याही एप्लिकेशनचा पासवर्ड 3 डी ठेवा.

(know how to protect your mobile from hacking Marathi article)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com