esakal | इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये लिंक कशी ॲड करावी? वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Instagram

इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये लिंक कशी ॲड करावी? वाचा सविस्तर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Instagram हे जगभरातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया ॲप्सपैकी एक आहे, जगभरातील कोट्यावधी लोक हे प्लॅटफॉर्म वापरतात. या App चे Google Play Store वर एक अब्जाहून अधिक डाउनलोड्स आहे. या प्लॅटफॉर्मवर वापरकर्ते अनेकदा त्यांच्या फॉलोअर्सना ते करत असलेल्या काम किंवा त्यांच्या प्रोडक्ट बद्दल ऑनलाईन पाहाण्यासाठी, तसेच ब्रॅण्डला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्याची जाहिरात करण्यासाठी लिंक्स वापरतात.

यापूर्वी, इन्स्टाग्रामने इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये लिंक देण्यासाठी 'स्वाइप अप' पर्याय दिला होता परंतु अलीकडेच इन्स्टाग्रामने तो बदलला आहे. या नवीन फीचरच्या मदतीन वापरकर्त्यांना इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये थेट लिंक देता येणार आहे. आज आपण इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये (Instagram Stories) लिंक कशी ॲड करावी या बद्दल जाणून घेणार आहोत.

हेही वाचा: अगदी कमी किमतीत खरेदी करा 7 सीटर कार, 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन

इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये लिंक कशी ॲड करावी

  • पहिल्यांदा इन्स्टाग्राम ॲप उघडा आणि ॲड स्टोरी पर्यायावर क्लिक करा.

  • एक फोटो घ्या आणि आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर अपलोड करा.

  • आता स्टिकर्स ट्रे उघडण्यासाठी वर दिलेल्या स्टिकर्स पर्यायावर टॅप करा.

  • स्टोरीज स्टिकर ट्रेमध्ये लिंक स्टिकर शोधा.

  • यानंतर त्यामध्ये URL पर्यायावर टॅप करा.

  • आता यामध्ये ती लिंक ॲड करा जी तुम्हाला तुमच्या फॉलोअर्स सोबत शेअर करायची आहे.

  • लिंक दिल्यानंतर done वर टॅप करा आणि आता स्टोरी शेअर करा.

  • तुम्ही एकदा स्टोरीमध्ये जाऊन सर्वकाही ठिक काम करत आहे की नाही हे तपासण्यासाठी लिंकवर क्लिक करुन पाहा.

स्टोरीमध्ये लिंक ॲड करण्याचे हे फीचर फक्त काही खात्यांपुरते मर्यादित आहे. ज्यासाठी वापरकर्त्यांचे किमान 10,000 फॉलोअर्स असणे आवश्यक आहे आणि तुमचे खाते बिझनेस किंवा क्रिएटर म्हणून रजिस्टर्ड असावे लागते. तरच तुम्ही स्टोरीजमध्ये लिंक ॲड करु शकता.

हेही वाचा: देशातील टॉप स्वस्त सीएनजी कार, ज्या देतात दमदार मायलेज

loading image
go to top