esakal | क्लबहाऊस अ‍ॅपच्या आयकॉनवर 'ती' महिला कोण? जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

Clubhouse

क्लबहाऊस हे अ‍ॅप मार्च २०२० मध्ये फक्त आयफोन वापरकर्त्यांसाठी लॉन्च करण्यात आले होते. त्याची वाढती लोकप्रियता पाहात आता ते अँड्रॉइड डिव्हाइससाठी देखील उपलब्ध आहे. आज आपण या सोशल नेटवर्किंग अ‍ॅपबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

क्लबहाऊस अ‍ॅपच्या आयकॉनवर 'ती' महिला कोण? जाणून घ्या

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

क्लबहाउस (Clubhouse) या ऑडिओ चॅट बेस्ड सोशल नेटवर्किंग अ‍ॅपची सगळीकडे चर्चा सुरु आहे. काही दिवसांपुर्वी या अ‍ॅपने अँड्रॉइड प्ले स्टोअरवर एक मिलीयन डाऊनलोड्सचा टप्पा देखील ओलांडला आहे. सध्या या सोशल नेटवर्क अ‍ॅपची जगभारात चर्चा सुरु आहे. टेस्ला कंपनीचे इलोन मस्क फेसबुकचे सिईओ मार्क झुकरबर्ग या दिग्गज लोकांच्या सपोर्टमुळे या अ‍ॅपची जगभरात जोरात चर्चा सुरु आहे. क्लबहाऊस हे अ‍ॅप मार्च २०२० मध्ये फक्त आयफोन वापरकर्त्यांसाठी लॉन्च करण्यात आले होते. त्याची वाढती लोकप्रियता पाहात आता ते अँड्रॉइड डिव्हाइससाठी देखील उपलब्ध आहे. आज आपण या सोशल नेटवर्किंग अ‍ॅपबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. (know-what-is-audio-chat-app-clubhouse-who-is-the-woman-in-the-apps-icon)

क्लबहाऊस अ‍ॅप काय आहे?

हा एक ऑडिओ चॅट आधारित सोशल नेटवर्किंग अ‍ॅप आहे जे सुरुवातीला फक्त आयफोन वापरकर्त्यांसाठी देण्यात आले होते. आचा ते Android वापरकर्ते हे Google Play Store वरून आपल्या स्मार्टफोनसाठी डाउनलोड करू शकतात. क्लबहाऊस हे एकप्रकारचे ऑडिओ सर्व्हर आहे जे एका वेळी तब्बल ५००० वापरकर्ते एकत्र येऊ शकतात. एकादा तुम्ही 'रुम' मध्ये जॉईन झालात की त्याठीकाणी एखाद्या विषयावर चर्चा करू शकता किंवा मुलाखत किंवा चर्चा ऐकू शकता. या रुममध्ये सामील झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपल्या आवडीचा विषय निवडावा लागेल. यात पुस्तके, टेक, व्यवसाय, आरोग्य अशा अनेक विषयांचा समावेश आहे.

हेही वाचा: Clubhouse App या आठवड्यात भारतात होणार लाँच; जाणून घ्या नवीन फीचर्सबद्दल

क्लबहाउस कसे वापरावे?

तुम्ही क्लबहाऊस अ‍ॅप डाऊनलोड केल्यास तुम्ही काही तुमच्या आवडीचे विषय निवडावे लागतील, ते ठराविक विषय फॉलो केल्यानंतर तुम्ही काही व्हर्चूअल चॅट रुम्स दिसतील त्यामधील लोकांना तुम्ही फॉलो करु शकता. या ठिकाणी रुम बनवणारी व्यक्ती कोण व्यक्ती बोलणार आहे याचा निर्णय घेते. जर तुम्हाला चॅट रुम मध्ये बोलायचे असेल तर तुम्हाला व्हर्चूअली हात वर करण्याचा पर्याय या अ‍ॅपमध्ये देण्यात आलेला आहे. पण तुम्हाला बोलण्याची संधी देण्याबाबतचा निर्णय रुम क्रिएटरकडे असेल.

क्लबहाऊसच्या सध्याच्या लोगोमध्ये कोण आहे?

प्रख्यात आशियाई अमेरिकन कलाकार आणि कार्यकर्ते ड्र्यू काटाओका (Drue Kataoka) या अ‍ॅपच्या लोगोवर देण्यात आलेला चेहरा आहेत. त्या पहिल्या आर्टीस्ट आणि आशियाई अमेरिकन आहेत ज्यांचा चेहरा एखाद्या अ‍ॅपवर वापरण्यात आला आहे तसेच ड्र्यू काटाओका या लोगोसाठी क्लबहाऊसने निवडलेल्या आतापर्यंतच्या आठवी व्यक्ती आहेत. कटाओका या 2020 साली क्लबहाऊस अ‍ॅप लाँच झाल्यापासून अगदी सुरुवातीच्या सदस्य आहेत. क्लबहाऊस कंपनी लिडरशीप टिमने अ‍ॅपमध्ये असे फीचर विकसित केले जे वापरुन लोक वेगवेगळ्या सामाजिक कामांसाठी पैसे डोनेट करु शकतात आणि ते फीचर लॉन्च करण्यास काटाओका यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. हे फीचर वापरुन वापरकर्ते या अ‍ॅपमधूनच पैसे डोनेट करु शकतात.

(know-what-is-audio-chat-app-clubhouse-who-is-the-woman-in-the-apps-icon)

हेही वाचा: Audio App Clubhouse नं लाँच केलं नवीन payment फिचर; असं करा easy payment