फोन अपग्रेड करताय? त्याआधी जाणून घ्या 3G, 4G आणि 5G मधील फरक

know what is the difference between 3g 4g and 5g cellular networks in detail
know what is the difference between 3g 4g and 5g cellular networks in detail Google
Updated on

सध्या अनेक जण घरून काम करत असल्यामुळे चांगल्या इंटरनेटची गरज वाढली आहे. लोक काम करण्यासाठी अधिक चांगल्या डिव्हाइससोबतच फास्ट नेटवर्क अपग्रेड करत आहेत, मग ते चांगले वाय-फाय कनेक्शन असो किंवा मोबाईल फोन. 2000 साली जिथे 3G नेटवर्क लाँच झाले आणि इंटरनेट स्पीडमध्ये नवा बदल झाला होता, आता लोकांना 5G नेटवर्कचे वेध लागले आहेत. अमेरिकेत 5G नेटवर्कची सुरुवात ही 2019 मध्ये झाली होती. त्यानंतर आता भारतीय बाजारपेठेत देखील 5G मोबाईलही आले आहेत. पण 5G मोबाईल फोनमध्ये पैशांची गुंतवणूक करण्यापूर्वी या सर्व नेटवर्कबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या.

3G, 4G आणि 5G मधील फरक

5G नेटवर्कबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला फास्ट नेटवर्क मिळेल. जुन्या नेटवर्कच्या तुलनेत सर्व नवीन नेटवर्कची स्पीड अधिक आहे. 4G नेटवर्कमधील टॉप स्पीड 100 एमबीपीएस आहे, जरी प्रत्यक्षात तुम्हाला हा स्पीड केवळ 35 एमबीपीएसपर्यंत मिळू शकतो. 3G नेटवर्कमध्ये तुम्हाला 3 MB प्रति सेकंदाचा वेग मिळतो. परंतु अनेकवेळा बीझी एरियामध्ये असल्यामुळे 4G नेटवर्कमध्येही तुम्हाला 4-5 Mbps पर्यंत स्पीड मिळतो. दुसरीकडे, जर आपण 5G नेटवर्कचा विचार केला तर त्यांची क्षमता 4G नेटवर्कपेक्षा 100 पट जास्त आहे. हा स्पीड सुमारे 20 Gbps पर्यंत जातो आणि तुम्हाला प्रत्यक्ष स्पीडबद्दल बोलायचे झाले तर तो स्पीड 50 mbps ते 3 Gbps पर्यंत असू शकतो. पण 3G नेटवर्क तुम्हाला ग्रामीण भागात सहज उपलब्ध आहे, तर दुसरीकडे 5G आणि 4G चा प्रसार काही शहरांपुरता मर्यादित आहे.

know what is the difference between 3g 4g and 5g cellular networks in detail
जिओने पुन्हा लाँच केले 5 नवे प्लॅन; वाचा काय आहेत बेनिफिट्स

5G चे देखील दोन प्रकार आहेत

5G च्या लो बँड नेटवर्कची स्पीड ही 4G पेक्षा थोडा जास्त म्हणजे 40-50 mbps आहे.

5G च्या उच्च बँड नेटवर्कची स्पीड ही 3GB प्रति सेकंदापर्यंत जाऊ शकतो.

लेटेंसी

लेटन्सी म्हणजे डेटाला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ होय. म्हणजेच डेटा ट्रान्सफरसाठी लागणारा वेळ. 4G नेटवर्कमधील डेटा ट्रान्सफरची ही वेळ 40 मिलीसेकंद आहे तर 5G नेटवर्क हे काम 1 मिलीसेकंदपर्यंत करू शकते.

नेटवर्क कव्हरेज

सध्या ग्रामीण भागात 4G कव्हरेजही उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत 5G चा प्रसार मोठ्या शहरांपुरता मर्यादित आहे. 4G चा बँडविड्थ स्पेक्ट्रम 5G पेक्षा लहान आहे. तर 5G नेटवर्क हे तीन वेगवेगळ्या बँडमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक बँडची स्वतःची फ्रिक्वेंसी रेंज आणि स्पीड असते. त्यामुळे, 5G ची क्षमता 3G आणि 4G दोन्ही नेटवर्कपेक्षा चांगली आहे.

know what is the difference between 3g 4g and 5g cellular networks in detail
Jio vs Airtel vs VI: 84 दिवसांचा कोणाचा प्लॅन आहे सर्वात स्वस्त?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com