इलेक्ट्रिक की पेट्रोल? कोणती स्कूटर आहे तुमच्यासाठी बेस्ट, जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

know which scooter electric or petrol scooter is best for you know advantages of both

इलेक्ट्रिक की पेट्रोल? कोणती स्कूटर आहे तुमच्यासाठी बेस्ट, जाणून घ्या

इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आल्यापासून पेट्रोल वाहन की इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) खेरीदी करावे याविषयी बऱ्याच जणांच्या मनात खूप गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) खरेदी करणे फायदेशीर राहील की पेट्रोल स्कूटरच बेस्ट आहे याबद्दल अनेक लोक संभ्रमात आहेत. तुम्हाला देखील हा प्रश्न पडत असेल तर आज आपण या दोन्ही स्कूटरचे फायदे आणि तोटे जाणून घेणार आहोत. जेणेकरुन तुम्हाला हा निर्णय घेणे सोपे जाईल.

इलेक्ट्रिक स्कूटर(Electric Scooter) चे फायदे

इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलायचे झाले, तर सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहे. एकीकडे ईव्ही इंधन डिझेल आणि पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करते, तर दुसरीकडे वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करत पर्यावरणाला मदत करते. दुसरीकडे, इलेक्ट्रिक स्कूटरच्या रनिंग कॉस्टबद्दल बोलायचे तर, ती चालवण्यासाठी खूप कमी खर्च येतो. साध्या इलेक्ट्रिक स्कूटरची धावण्यासाठी येणारा खर्च सुमारे 50 पैसे प्रति किलोमीटर आहे. त्याच वेळी, इलेक्ट्रिक स्कूटरचा सर्व्हिस चार्ज खर्च देखील खूप कमी आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरचे तोटे

पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटर अजूनही महाग आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर खराब झाल्यास त्याचे मकॅनीक सहजासहजी सापडणार नाही. इलेक्ट्रिक स्कूटरसाठी चार्जिंगची फारशी पायाभूत सुविधा अद्याप विकसित केलेली नाही. जर तुम्हची चार्जींग वाटेत संपली तर तुम्हाला लांबचे अंतर चालावे लागेल, हा इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा सर्वात मोठी तोटा आहे. तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटरने लांबचा प्रवास करू शकत नाही, कारण ती डिस्चार्ज झाल्यावर तुम्ही ती कुठेही चार्ज करता येत नाही.

हेही वाचा: देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्स; किंमत 28,000 पासून सुरु

पेट्रोल स्कूटरचे फायदे

इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा पेट्रोल स्कूटर स्वस्त आहेत. त्याच वेळी, इलेक्ट्रिक स्कूटर सामान्यतः पेट्रोल स्कूटरपेक्षा जास्त महाग असतात. स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्सही आता बाजारात येत असल्या तरी, ग्राहक त्यांच्या रेंजबद्दल (एकदा चार्ज केल्यास चालण्याची क्षमता) फारसे समाधानी नाहीत. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात पेट्रोल स्कूटर खराब झाली तर ती दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला सर्वत्र मेकॅनिक सहज सापडतील. पेट्रोल स्कूटरसाठी इंधन सर्वत्र सहज उपलब्ध होते, तसेच कोणत्याही शहरातील कोणत्याही पेट्रोल पंपावरून त्यात इंधन भरता येते. तुम्ही पेट्रोल स्कूटरने लांबचा प्रवास सहज करू शकता

पेट्रोल स्कूटरचे तोटे

पेट्रोल स्कूटरची रनिंग कॉस्ट जास्त आहे आणि पेट्रोलचे दर खूप वेगाने वाढत आहेत. पेट्रोल स्कूटरची वेळोवेळी सर्व्हिस करावी लागते, ज्याचा खर्च तुलनेने खूप जास्त असतो, त्याची देखभाल खर्च देखील जास्त आहे. पेट्रोल स्कूटरमधून निघणाऱ्या धुरामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते.

हेही वाचा: फक्त फोन सुरु ठेवायचाय? हे आहेत Jio, Airtel अन् Vi चे बेस्ट प्लॅन्स

Web Title: Know Which Scooter Electric Or Petrol Scooter Is Best For You Know Advantages Of Both

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..