केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी लोकसभेत देशातील सॉफ्टवेअर निर्यातीची (Computer System) गेल्या पाच वर्षांतील माहिती मांडली आहे.
-संतोष मिठारी
कोल्हापूर : कुशल मनुष्यबळ, नवतंत्रज्ञान वेगाने आत्मसात करण्याचे कौशल्य आणि स्पर्धात्मकदृष्ट्या कमी असलेले दर यांच्या जोरावर कोल्हापूरने सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) निर्यातीत भरारी घेतली आहे. ही निर्यात आता ५० टक्क्यांनी वाढून १८९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.