
Car Collections: अंबानी ते टाटा... भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींकडे आहेत 'या' आलिशान गाड्या
luxury car collections of Top 10 Indian billionaires: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानीपासून ते रतन टाटा, आनंद महिंद्रा याच्या गॅरेजमध्ये अनेक लग्झरी कार्स आहेत. या उद्योगपतींकडे अनेक महागड्या कार आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या ताफ्यात असलेल्या अशाच शानदार कार्सविषयी जाणून घेऊया.
हेही वाचा: UPI Apps: GPay-Phone Pe वरून दिवसाला किती रक्कम पाठवू शकता? जाणून घ्या

Mukesh Ambani
मुकेश अंबानी
अंबानींकडे महागड्या गाड्यांचा भल्लामोठा ताफा आहे. त्यांच्याकडे १४ कोटींची रॉल्स रॉयल कुलिनन आहे. याशिवाय, Mercedes-Benz S600 Guard, BMW 760 Li, Bentley Bentayga, Maserati Levante, Cadillac Escalade सारख्या १७० कारचा त्यांच्या ताफ्यात समावेश आहे.
गौतम अदानी
भारत व जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या गौतम यांची सर्वात आवडती कार Rolls Royce Ghost असून, या गाडीची किंमत ६.५ कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे BMW 7 Series, Ferrari California आणि Audi Q7 सारख्या लग्झरी कार देखील आहेत.
रतन टाटा यांना त्यांच्या साध्या राहणीमानासाठी ओळखले जाते. त्यांच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या कार्स आहेत. मात्र, त्यांना अनेकदा नॅनो इलेक्ट्रिक कारसोबत पाहण्यात आले आहे.

Anand Mahindra
आनंद महिंद्रा
महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांना महागड्या व लग्झरी कारची फारशी आवड नाही. अनेकदा त्यांना स्वतःच्याच कंपनीची गाडी चालवताना पाहण्यात आले आहे. त्यांच्याकडे नवीन महिंद्रा स्कॉर्पियो-एन, एक्सयूव्ही७०० सह अनेक शानदार कार आहेत.
अदर पुनावाला
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांच्याकडे Ferrari 360 Spider, Rolls Royce Phantom, McLaren 720s, Bentley Continental GT आणि The Bat Mobile सारख्या कोट्यावधी रुपयांच्या आलिशान गाड्या आहेत.
दिलीप संघवी
दिलीप संघवी हे सन फार्मास्यूटिकल इंडस्ट्रीजचे चेअरमन आहेत. त्यांच्याकडे Rolls Royce Ghost, Bentley Mulsanne, Mercedes Benz GL Class, Audi A8 आणि BMW X5 सह अनेक महागड्या कार्स आहेत.
लक्ष्मी मित्तल
स्टील किंगच्या नावाने प्रसिद्ध लक्ष्मी मित्तल हे आर्सेलर मित्तलचे सीईओ आणि चेअरमन आहेत. लक्ष्मी मित्तल यांच्याकडे २० पेक्षा अधिक जास्त लग्झरी कार्स आहेत, यामध्ये मर्सिडीज बेंझ सी-क्लास, पोर्शे बॉक्सटरसह बीएमडब्ल्यू च्या महागड्या कारचा समावेश आहे.

Azim Premji
अझीम प्रेमजी
विप्रोचे संस्थापक आणि चेअरमन अजीम प्रेमजी यांना देखील लग्झरी कारची फारशी आवड नाही. त्यांना फॉर्ड एस्कॉर्ट, टोयोटो कोरोला आणि मर्सिडीज कारसोबत पाहण्यात आले आहे.
नारायण मुर्ती
उद्योगपती एन.आर. नारायण मुर्ती हे इन्फोसिसचे संस्थापक आहे. त्यांच्याकडे फारशा महागड्या गाड्या नाहीत. त्यांना अनेकदा स्कडो लॉरा आणि महिंद्रा स्कॉर्पियो सारख्या कारसोबत पाहण्यात आले आहे.
शिव नाडर
HCL Technologies Limited चे संस्थापक आणि चेअरमन असलेल्या शिव नाडर यांच्याकडे Rolls Royce Phantom, Bentley Mulsanne, Jaguar XJL, Mercedes 500SEL AMG सारख्या महागड्या कार आहेत.
हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट