Maserati Levante : किमतीच्या मानानं ही कार किती चांगली? वाचा Quick Review

जागतिक मॉडेलमध्ये इलेक्ट्रिक पॉवरट्रेन सादर करण्याबरोबरच, भारताच्या विशिष्ट मॉडेलला हायब्रीड पॉवरट्रेनचा पर्याय देखील मिळाला आहे
Maserati Levante
Maserati Levanteesakal

Maserati Levante : मासेराती ही कार उत्पादक कंपनी स्टायलिश कार बनवण्यासाठी ओळखली जाते. यासोबतच या गाड्यांचा परफॉर्मन्सही जबरदस्त आहे. त्यांच्या रेंजमध्ये, Levante SUV हे कंपनीचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे आणि अशी SUV भारतातील अनेकांची आवडती कार आहे आणि त्याच्या सोयीस्कर डिझाइनमुळे ती रस्त्यावर चालवण्यासाठीसुद्धा योग्य आहे. जागतिक मॉडेलमध्ये इलेक्ट्रिक पॉवरट्रेन सादर करण्याबरोबरच, भारताच्या विशिष्ट मॉडेलला हायब्रीड पॉवरट्रेनचा पर्याय देखील मिळाला आहे.

मासेराती लेवांते पॉवरट्रेन

पॉवरट्रेनसाठी एक माइल्ड हायब्रिड युनिट आहे ज्याला 48V सौम्य हायब्रिड सिस्टमसह 2.0L टर्बो पेट्रोल इंजिन मिळते. जे कंबाइन 330bhp पॉवर आणि 450Nm टॉर्क जनरेट करते. यासोबतच, 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन लेवांतेला अधिक लक्झरी आणि प्रीमियम बनवते. ही कार अवघ्या 6 सेकंदात 20-100 किमी/ताशीचा वेग गाठते. त्याचा टॉप स्पीड २४० किमी/तास आहे.

भारतीय रस्त्यांसाठी उत्तम

याचे इंजिन अतिशय सायलेंट आहे आणि तुम्ही विविध मोड्ससह विविध कार्यप्रदर्शन मिळवू शकता. स्टॉप-गो ट्रॅफिकसाठी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह, लेवांते हायब्रिड सायलेंट आणि गाडी चालवण्यास अतिशय सोपे आहे. बिग 21-इंच व्हिल आणि स्पोर्टी स्टेन्स असूनही, Levante भारतीय रस्त्यांवर सुरळीत ड्रायव्हिंगचा अनुभव देते.

ड्रायव्हिंग एक्सपीरियंस

मासेरातीच्या इतर गाड्यांप्रमाणे, लेवांतेला त्याच्या कामगिरीची चाचणी घेण्यासाठी अनेक वाकड्यातिकड्या रस्त्यांवर नेले. Levante Hybrid मधून चांगला परफॉर्मंस मिळविण्यासाठी, तुम्हाला स्पोर्ट मोड निवडणे आवश्यक आहे. या मोडमधील पॉवर डिलिव्हरी उत्कृष्ट आहे आणि एक्झॉस्ट व्ही 6 इंजिन सारखा आवाज करते. याचा पावरही जबरदस्त आहे आणि जेव्हा तुम्ही पॅडल शिफ्टर्सवर ढकलता तेव्हा तुम्हाला वेगळ्या लेवलच्या परफॉर्मंसचा अनुभव घेता येतो. स्पोर्ट मोडसह Levante त्याच्या सेगमेंटमधील इतर कारपेक्षा स्पोर्टी परफॉर्मन्स मिळवते. लेदरने कव्हर कॅबिन लेटेस्ट डिझाइनसह आहे . Levante उत्तम सुविधांसह अतिशय आरामदायक आणि प्रशस्त आहे. (Luxury Cars)

Maserati Levante
Tata Upcoming Cars : शानदार व्हॅरिएंटमध्ये येतेय टाटाची ही नवी कार, जाणून घ्या खासियत

Maserati Levante किंमत

याला हायब्रीड पॉवरट्रेनसह दुप्पट डिजिटल मायलेज देखील मिळते आणि शांत आणि शुद्ध एअर सस्पेन्शनसह आपले भारतीय रस्ते हाताळण्यास ती पूर्णपणे सक्षम आहे. हायब्रीड मासेराटी असण्याव्यतिरिक्त, ही एक परफॉर्मन्स ओरिएंटेड लक्झरी एसयूव्ही देखील आहे. छान लुक आणि ड्रायव्हिंगचा अनुभव याला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपासून वेगळे बनवते आणि मासेराती बॅजिंग देखील उत्तम आहे. उत्तम फिचर्ससह या एसयूव्हीसाठी 1.5 कोटी रुपये खर्च करावे लागतील. (Car)

Maserati Levante
Solar Car : इनोव्हेशनला सलाम! टाटा नॅनोपासून बनवली 'सोलार कार'; फक्त ३५ रुपयांत चालते १०० किमी

अर्थात किंमत महागडी असली तरी ही कार सर्व दृष्टीने अतिशय उत्तम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com