Mahindra eSUV: चक्क इतक्या कोटींना विकली गेली 'मेड इन इंडिया' eSUV, महिंद्रांनी स्वतः सोपवली चावी l Mahindra eSUV Mahindra & Mahindra XUV400 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahindra eSUV

Mahindra eSUV: चक्क इतक्या कोटींना विकली गेली 'मेड इन इंडिया' eSUV, महिंद्रांनी स्वतः सोपवली चावी

Mahindra eSUV : इंधनाच्या दरांमध्ये सातत्यानं होत असलेली वाढ आणि प्रदूषणाच्या वाढत्या समस्येमुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे कल वाढत आहे. सरकारदेखील इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी प्रोत्साहन देत आहे. अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि कार्स भारतीय बाजारपेठेत लॉंच केल्या आहेत. पण महिंद्रांनी मात्र आपली एक एडिशन लाँच करून तिचा लिलाव देखील केलाय.

Mahindra & Mahindra अलीकडेच त्यांच्या XUV400 eSUV च्या अनेक एडिशन्सचा लिलाव केलाय. या इलेक्ट्रिक व्हेईकल्स हैदराबादच्या करुणाकर कुंदावरम यांना 1.75 कोटींना विकण्यात आल्यात. आणि या लिलावातून मिळणारी रक्कम चॅरिटीमध्ये दिली जाणार असल्याचं कंपनीने म्हटलंय. महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा यांनी कुंदावरम यांना या एडिशन्सच्या चाव्या सुपूर्द केल्या आहेत.

महिंद्राची XUV400 वन-ऑफ-वन एडिशन प्रताप बोस, रिमझिम दादू यांनी डिझाईन केली होती. ही स्पेशल एडिशन 'रिमझिम दादू एक्स बोस' बॅज सोबत आर्क्टिक ब्लू थीममध्ये डिझाईन करण्यात आली आहे. यात निळ्या रंगाच्या आऊटलाईनसह कॉपर-फिनिश्ड ट्विन-पीक्स लोगो देखील मिळतो.

अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी..

Mahindra XUV400 eSUV मध्ये 39.4 kWh बॅटरी पॉवर देण्यात आली आहे. तर XUV400 EC ला 34.5 kWh बॅटरी मिळते. eSUV 3 years /unlimited किलोमीटरच्या वॉरंटीसह येते आणि या व्यतिरिक्त, बॅटरी आणि मोटरसाठी 8 years/160,000 km ची (जे आधी होईल) वॉरंटी आहे.

दोन प्रकारांमध्ये उपलब्ध..

स्टँडर्ड महिंद्रा XUV 400 eSUV आता XUV400 EC आणि XUV400 EL या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. एका व्हेरियंटची किंमत आहे 15.99 लाख तर दुसरीची किंमत आहे 18.99 लाख. यात 5 रंग उपलब्ध आहेत, आर्कटिक ब्लू, एव्हरेस्ट व्हाइट, गॅलेक्सी ग्रे, नेपोली ब्लॅक आणि इन्फिनिटी. यात सॅटिन कॉपरचा ड्युअल टोन ऑप्शन आहेत.

इंटेरियर..

eSUV गाडीच्या आत Android Auto आणि Apple CarPlay सपोर्टसह 17.78 सेमी इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. यात SUV BlueSense PlusApp आणि 60 हून अधिक मोबाइल अॅप आधारित कनेक्टेड फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत.

या ईएसयूव्हीचं बुकिंग 26 जानेवारीपासून सुरू झालं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या मॉडेलसाठी आतापर्यंत 15,000 हून अधिक बुकिंग झाले आहेत. महिंद्र अँड महिंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या बुकिंगची डिलिव्हरी अंदाजे सात महिन्यांत पूर्ण करण्यात येईल.

टॅग्स :Mahindra and Mahindra