Anand Mahindra Dance Video: चक्क आनंद महिंद्रा नाटू नाटूवर थिरकले! रामचरण तुला ऑस्करसाठी...

Anand Mahindra Dance Video:
Anand Mahindra Dance Video:Esakal

गेल्या काही दिवसांपासुन भारतात फक्त एस एस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाने भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक रेकॉर्ड केले आणि त्यातील नाटू नाटू गाण्याने तर सर्वांनाच वेड करत सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत स्थान मिळालं आहे. त्यामुळे सर्वस्तरावरुन या चित्रपटाच कौतुक होत आहे. तर अनेकांनी या गाण्याचे हुक स्टेप करत गाण्याच्या टिमला शुभेच्छाही दिल्या आहेत. असा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Anand Mahindra Dance Video:
Urvashi Rautela: उर्वशीच्या नशीबात हा ऋषभही नाही? व्हायरल फोटोची कहाणी वेगळीच..

महिंद्रा आणि महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा हे ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. ते काही अनोख्या गोष्टी तिथे पोस्ट करतात ज्या व्हायरल होतात. अलीकडेच आनंद महिंद्रा यांची एक पोस्ट ट्विटरवर व्हायरल झाली आहे ज्यामध्ये ते डान्स स्टेप्स करताना दिसत आहे.

Anand Mahindra Dance Video:
Bigg Boss 16 Finale: 'राजा माणुस हा दिलदार', शिवचं बिग बॉसकडून तोंड भरुन कौतुक

हैदराबादमध्ये सुरू असलेल्या एबीबी एफआयए फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप येथे आनंद महिंद्रा हे उपस्थिती होती. शुक्रवारी, महिंद्रा समूहाच्या Gen3 फॉर्म्युला ई रेसच्या लॉन्चच्या वेळी, आनंद महिंद्रा यांनी साउथ सुपरस्टार आणि RRR अभिनेता रामचरण यांची भेट घेतली. यावेळी त्यांना राम चरणसोबत नाटू नाटू गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला गेला नाही. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये डान्स व्हिडिओ सोबतच या गाण्यासाठी नामांकन मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत अभिनंदन केले आहे.

Also Read - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

हा डान्स व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले, “रेस व्यतिरिक्त, हैदराबाद प्रिक्समध्ये रामचरणकडून नाटू नाटू गाण्याच्या बेसिक स्टेप शिकून बोनस मिळाला. धन्यवाद माझ्या मित्रा… ऑस्करच्या शुभेच्छा.” आनंद महिंद्राचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आणि ट्विटर युजर्सनी त्याच्या डान्सचे कौतुक करायला सुरुवात केली.

Anand Mahindra Dance Video:
Bigg Boss 16 Grand Finale: 'आणि...'बिग बॉस 16'चा महाविजेता आहे..', फिनालेपूर्वी 'तो' व्हिडिओ व्हायरल

ABB FIA Formula E World Championship च्या सीझन 9ची सुरवात शुक्रवारी 11 फेब्रुवारीपासून हैदराबादमध्ये झाली आहे. येथे इलेक्ट्रिक कार रेस आयोजित करणारं हैदराबाद हे जगातील 30 वे आणि भारतातील पहिले शहर बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com