Roblox, PUBG सारख्या 28 गेम्समध्ये मालवेअर; साडेतीन लाख युजर्सचा आर्थिक डेटा हॅक

Pubg
PubgSakal

नवी दिल्ली - ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या २८ गेम्सच्या माध्यमातून युजर्सची आर्थिक माहिती अर्थात डेटा हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. रॉब्लॉक्स, FIFA, PUBG आणि Minecraft सारख्या लोकप्रिय गेम्सचा या 28 गेम्समध्ये समावेश आहे. या गेम्सच्या माध्यमातून मालवेअरद्वारे आर्थिक डेटा हॅक करण्यात आला आहे. जुन-जुलै 2021 काळात सुमारे 92 हजार फाईल्सद्वारे 3 लाख 84 हजार युजर्सचा डेटा हॅक करण्यात आला आहे. (malware in 28 games news in Marathi

)

Pubg
राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा म्हणजे केवळ मनोरंजन; नारायण राणेंचा हल्लाबोल

कॅस्परस्की संशोधकांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षात रिलीज झालेल्या एल्डन रिंग, हॅलो आणि रेसिडेंट एव्हिलचा देखील आक्रमणकर्त्यांनी सक्रियपणे गैरवापर केला आहे. या गेम्सच्या माध्यमाथून 'रेडलाइन' मालवेअर पसरवण्यात आले आहे. रेडलाइन हे पासवर्ड चोरणारे सॉफ्टवेअर आहे, जे व्यक्तीच्या डिव्हाइसमधून पासवर्ड, सेव्ह केलेले बँक कार्ड तपशील, क्रिप्टोकरन्सी वॉलेट्स आणि VPN सेवांसाठी क्रेडेन्शियल्स यांसारखा संवेदनशील डेटाची चोरी करते.

"सायबर गुन्हेगार गेम खेळणाऱ्या युजर्सवर हल्ला करण्यासाठी, त्यांचा क्रेडिट कार्ड डेटा आणि अगदी गेम खाती चोरण्यासाठी अधिकाधिक नवीन युक्त्या आणि साधने तयार करत आहेत, ज्यात महागड्या स्किन असू शकतात. ज्या नंतर विकल्या जातात. उदाहरणासाठी जगभरात प्रचंड प्रसिद्ध मिळवत असलेल्या ई-स्पोर्टसवर स्टाईक देखील टाकू शकतात, असं कॅस्परस्की येथील वरिष्ठ सुरक्षा संशोधक अँटोन व्ही. इव्हानोव्ह यांनी सांगितलं.

डाउनलोड करताना अनावश्यक प्रोग्राम्स आणि अॅडवेअरमध्ये संशोधकांना ट्रोजन स्पायस देखील आढळले आहे. जेकी कीबोर्डवर टाईप केलेला कोणताही डेटा ट्रॅक करण्यास आणि स्क्रीनशॉट घेण्यास सक्षम असे मालवेअर आहे.

Pubg
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 'हा' युवा नेता असणार 'आप'चा चेहरा

"CS:GO, PUBG आणि Warface" साठी इन-गेम स्टोअर्सच्या संपूर्ण इंटरफेसची नक्कल करून, स्कॅमर फसवी पृष्ठे तयार करतात, संभाव्य युजर्सला गेममध्ये विविध शस्त्रे आणि स्कील विनामूल्य प्रदान करतात. शिवाय भेटवस्तूचे आमीष दाखवून खेळाडूंना त्यांच्या Facebook किंवा Twitter सारख्या सोशल नेटवर्कींग साईटसचा लॉगीन डेटा प्रविष्ट करण्यास भाग पाडतात.

दरम्यान सोशल अकाउंट ताब्यात घेतल्यानंतर, हल्लेखोर कार्ड तपशीलांसाठी वैयक्तिक संदेश पाठवतात किंवा युजर्सच्या विविध मित्रांकडे पैशाची मागणी करून फसवणूक करतात, असं संशोधकांनी सांगितले. 2021 च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत डेटा हॅक करण्याचे प्रमाण 13 टक्क्यांनी वाढले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com