
Best Car: ४० हजार द्या अन् नवीन गाडीसह साजरे करा २०२३ वर्ष, पाहा मारुतीच्या 'या' कारवरील भन्नाट ऑफर
Best car under 5 lakh: बजेट कार खरेदी करायची असल्यास सर्वात प्रथम Maruti Alto K10 चे नाव समोर येते. छोट्या कुटुंबासाठी परफेक्ट असलेल्या या कारची किंमत खूपच कमी आहे. ५ लाखांच्या या कारला तुम्ही अवघ्या ४० हजार रुपयात घरी घेऊन जाऊ शकता. Maruti च्या या कारच्या किंमत, फायनान्स प्लॅन आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा: Recharge Plans: ३०० रुपयात महिनाभर सुरू राहील मोबाइल नंबर, अनलिमिटेड कॉलिंग-डेटाचाही फायदा; पाहा डिटेल्स
Maruti Alto K10 ची किंमत
Maruti Alto K10 एलएक्सआयच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ४,८२,००० रुपये आहे. कारची ऑन रोड किंमत ५,३१,८४९ रुपये आहे. मात्र, तुम्हाला कारसाठी एकाच वेळी ५ लाख रुपये खर्च करायचे नसल्यास फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध आहे. अवघ्या ४० हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर तुम्ही कारला खरेदी करू शकता.
४० हजार रुपये डाउन पेमेंट केल्यास तुम्हाला बँकेकडून ४,०२,९९२ रुपये कर्ज घ्यावे लागेल. यानंतर तुम्हाला ५ वर्ष दरमहिन्याला ८,५२३ रुपये ईएमआय भरावा लागेल. म्हणजेच, दरमहिना फक्त साडे हजार रुपये भरल्यास कार तुमची होईल.
Maruti Alto K10 LXi चे फीचर्स
Maruti Alto K10 LXi मध्ये ९९८ सीसी इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन ६५.७१ बीएचपी पॉवर आणि ८९ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशनसह येते. कंपनीचा दावा आहे की, कार प्रती लीटर २४.३९ किमी माइलेज देते. मारुतीच्या या कारमध्ये इंटेरियरसह शानदार फीचर्स मिळतील.