नवीन कार खरेदी करायचीये? Maruti Baleno आहे एकदम परफेक्ट, फक्त ९९ हजारात घेऊन जा घरी | Maruti Suzuki | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maruti Baleno

Maruti Suzuki: नवीन कार खरेदी करायचीये? Maruti Baleno आहे एकदम परफेक्ट, फक्त ९९ हजारात घेऊन जा घरी

Maruti Baleno Zeta Details: Maruti Suzuki च्या गाड्यांना ग्राहकांकडून शानदार प्रतिसाद मिळतो. कंपनीकडे गाड्यांची एक मोठी रेंज उपलब्ध आहे. यापैकीच एक मारुती बलेनो (Maruti Baleno) ही प्रीमियम हॅचबॅक कार आहे. तुम्ही जर १० लाखांच्या बजेटमध्ये येणारी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Maruti Baleno तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. Maruti Baleno च्या टॉप व्हेरिएंटविषयी सविस्तर जाणून घ्या.

हेही वाचा: Redmi Phone: 'या' फोनला खरेदीसाठी ग्राहकांची लागली रांग, अवघ्या ५ मिनिटात ३ लाख यूनिट्सची विक्री

Maruti Baleno Zeta ची किंमत

Maruti Baleno Zeta ची एक्स शोरुम किंमत ८,२६,००० रुपये आहे. तर ऑन रोड किंमत ९,३५,९४६ रुपयांपर्यंत जाते. तुम्ही गाडीला जवळपास ९.३६ लाख रुपये खर्चून घरी घेऊन जाऊ शकता. मात्र, तुम्हाला एकदम एवढी रक्कम खर्चून गाडी खरेदी करायची नसल्यास फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध आहे.

तुम्ही फक्त ९९ हजार रुपयांच्या डाउन पेमेंटसह गाडीला घरी घेऊन जाऊ शकता. डाउन पेमेंटनंतर बँकेकडून ८,३६,९४६ रुपये लोन घ्यावे लागेल. यानंतर ५ वर्ष दरमहिन्याला १७,७०० रुपये ईएमआय भरावा लागेल. अशाप्रकारे, दरमहिना फक्त १७,७०० रुपये देऊन गाडीला घरी घेऊन जाता येईल.

हेही वाचा: Wi-Fi Booster: स्लो इंटरनेटला वैतागला? हाय-स्पीडसाठी वापरा 'हे' खास डिव्हाइस

Maruti Baleno Zeta चे फीचर्स

Maruti Baleno Zeta मध्ये ११९७ सीसीचे तीन सिलेंडर इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन ८८.५० बीएचपी पॉवर आणि ११३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की, कार प्रती लीटर २२.३५ किमी माइलेज देते.

मारुती बलेनोमध्ये मिळणाऱ्या फीचर्सविषयी सांगायचे तर यात हेड अप डिस्प्ले, ३६० डिग्री व्ह्यू कॅमेरा, अँड्राइड ऑटो आणि अ‍ॅपल कार प्ले कनेक्टिव्हिटीसह येणारी टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, ऑटो क्लाइमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट स्टॉप बटन, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम सारखे फीचर्स मिळतील.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट