
नवी दिल्ली : मारुती सुझुकी इंडियाने एका वर्षाच्या आत भारतातील सर्वांत मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिसाशी ताकेउची यांनी आज भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये सांगितले. मारुती सुझुकीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार ई-विटारा येथे सादर केली.