esakal | मारुती सुझुकीने वर्षभरात चौथ्यांदा वाढवल्या कारच्या किंमती
sakal

बोलून बातमी शोधा

Maruti Suzuki

देशातील सर्वात मोठी कार निर्मिती करणारी कंपनी मारुती सुझुकीने मोठा निर्णय घेतला आहे.

मारुती सुझुकीने वर्षभरात चौथ्यांदा वाढवल्या कारच्या किंमती

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी कार निर्मिती करणारी कंपनी मारुती सुझुकीने मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा मारुती सुझुकी इंडियाने केली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, काही निवडक मॉडेलच्या गाड्यांची किंमत १.९ टक्के वाढवण्यात आली आहे.

कंपनीने गाड्यांची किंमत वाढवण्याचे कारण वाहनांची इनपूट कॉस्ट वाढल्याचं सांगितलं आहे. गेल्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने स्टॉक एख्सचेंजच्या एका फायलिंगवेळी घोषणा केली होती की, ६ सप्टेंबरपासून निवडक मॉडेलच्या एक्स शोरूम किंमतीत १.९ टक्के वाढ केली जाईल.

हेही वाचा: अर्थभान : ‘पीएफ’चे नक्की काय होणार आहे?

मारुती सुझुकीने या वर्षात चौथ्यांदा वाहनांच्या किंमतीत वाढ केली आहे. याआधी कंपनीने जानेवारी महिन्यात १.६ टक्के वाढ केली होती. एप्रिल महिन्यात १.९ टक्के आणि जुलै महिन्यात फक्त सीएनजी वाहनांच्या किंमतीत ०.४ टक्के वाढ बघायला मिळाली होती. आता चौथ्यांदा मारुती सुझुकीने कारच्या किंमतीत वाढ केली आहे.

कंपनीच्या या निर्णयाचा थेट परिणाम नवीन कार खऱेदी करणाऱ्या ग्राहकांवर होणार आहे. कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी सांगितलं की, एप्रिल २०२० नंतर कमोडिटी प्राइज वाढली आहे. स्टीलच्या किंमती ३८ हजार प्रति टनावरून ६५ हजार प्रति टन इतक्या झाल्या आहेत. तर कॉपरची किंमत ६२०० डॉलर प्रति टनावरून १० हजार २०० डॉलर प्रति टन झाली आहे. यामुळेच वाहनांच्या निर्मिती खर्चात वाढ झाली आहे.

हेही वाचा: ‘अर्थ’बोध : तुम्ही रत्ने विकून, दगड-गोटे तर सांभाळत नाही ना?

वाहन निर्मितीचा खर्च वाढला असून देशातील वाहन क्षेत्राला हे सेमी कंडक्टरच्या तुटवड्याची समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे मारुती सुझुकी, महिंद्रा यांसारख्या कंपन्यांनी त्यांचे प्रोडक्शन काही दिवस बंद केलं आहे. सेमीकंडक्टर हे सध्याच्या काळात वाहनांमध्ये वापरण्यात येणारी एक चीप आहे. ही मलेशिया सारख्या देशातून आयात केली जाते. मात्र लॉकडाऊनमुळे हा माल मिळण्यात अडथळा येत आहे.

loading image
go to top