esakal | मारुतीच्या पावणे दोन लाख गाड्यांचा 'रिव्हर्स गियर'; कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

Maruti Suzuki Cars

मारुतीच्या पावणे दोन लाख गाड्यांचा 'रिव्हर्स गियर'; कारण...

sakal_logo
By
सुधीर काकडे

मारुती सुझूकी (Maruti suzuki) कंपनीने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी मारुती सुझूकी इंडियाने घेतलेल्या निर्णयानुसार कंपनीच्या पेट्रोल व्हेरिअंटमधील सियाझ, अर्टिका, वितारा, ब्रेझा, एस-क्रॉस आणि एक्सएल-६ या गाड्या कंपनीने परत बोलावल्या आहेत. या व्हेरिएंटमधील तब्बल १८१,७५४ मॉडेलमध्ये मॅन्युफॅक्चर करताना झालेल्या काही चुकांमुळे या गाड्या परत बोलवण्यात आल्या आहेत. या चूकांमुळे पॅसेंजरच्या सुरक्षिततेला धोका होऊ शकतो म्हणून या गाडया परत बोलावण्यात आल्या असल्याची शक्यता आहे.

ग्राहकांचे हीत लक्षात घेऊन मारुती सुझूकी कंपनीने हा निर्णय घेतला असून, या गाड्यांचे मोटर जनरेटर युनीट तपासुन आणि बदलुन देण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती ग्राहकांना मारुती सुझूकीच्या अधिकृत वर्कशॉपकडून दिली जाईल असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. कंपनीने वापस बोलावलेल्या या गाड्यांटी रिप्लेसमेंट यावर्षी नोव्हेंबर मध्ये सुरु होईल. तरी या गाड्या विकत घेतलेल्या ग्राहकांनी जास्त पाणी असलेल्या भागातून ही वाहन चालवू नये अशी विनंती कंपनीकडून करण्यात आली आहे. तरी ग्राहक कंपनीच्या वेबसाईटला भेट देऊन या संदर्भातील अधिक माहिती घेऊ शकतात.

हेही वाचा: Amazon चे किसान स्टोर लॉन्च; शेती संबंधी प्रत्येक वस्तू मिळणार घरपोच

कंपनीची अधिकृत वेबसाईट www.marutizuzuki.com वर जाऊन IMP Customer Info हा पर्याय निवडून, त्यामध्ये आपल्या वाहनाचा १४ अंकी चेसीज नंबर टाकून आपल्या वाहनाबद्दलची माहिती जाणून घेऊ शकतो. ग्राहकांना हा चेसीज नंबर वाहनाच्या ID प्लेटवर तसेच वाहनातच्या रजिस्ट्रेशनच्या कागद पत्रांवर मिळेल. मात्र या सर्व प्रक्रीये दरम्यान ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

देशातील सर्वात मोठ्या कार निर्मीती कंपन्यांपैकी एक असलेल्या मारुती सुझूकीने सांगितले की, सेमी कंडक्टरच्या कमतरतेमुळे सप्टेंबर महिन्यात उत्पादन कमी होईल. सप्टेंबर महिन्यातील उत्पादन हे कंपनीच्या उत्पादनापेक्षा ४० टक्केच असेल.

loading image
go to top