esakal | Amazon चे किसान स्टोर लॉन्च; शेती संबंधी प्रत्येक वस्तू मिळणार घरपोच
sakal

बोलून बातमी शोधा

Amazon

Amazon चे किसान स्टोर लॉन्च; शेती संबंधी प्रत्येक वस्तू मिळणार घरपोच

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज अमेझॉन (Amazon) किसान स्टोअर लाँच केले. हे स्टोअर Amazon.in या वेबसाइटवर उपलब्ध असेल. तसेच या स्टोरमघ्ये शेतीशी संबंधित सर्व गोष्टी उपलब्ध असणार आहेत. आता शेतकरी घरी निवांत बसून शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू ऑनलाईन ऑर्डर करू शकतील. या किसान स्टोअरमध्ये 8000 हून अधिक विक्रेत्यांची उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांना बियाण्यांपासून शेती उपकरणे, ऑर्डर करता येतील.

नरेंद्र सिंह तोमर लॉन्च इव्हेंटला संबोधित करताना म्हणाले की, Amazon किसान स्टोअर सुरू करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. यामुळे शेतकरी आणि शेतीशी निगडित लोकांना खूप फायदा होईल. शेतकरी घरी बसून शेतीशी संबंधित वस्तू मागवू शकतील. ते म्हणाले की, पीएम मोदींचा भर नेहमीच शेतीच्या विकासावर असतो. अमेझॉनच्या या उपक्रमाचे मंत्र्यांनी स्वागत केले आहे. शेतकरी फक्त एका क्लिकवर घरी बसून ऑर्डर देऊ शकतील. अशा प्रकारे शेतीशी संबंधित उत्पादने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतील. हे अगदी त्याच ऑनलाइन शॉपिंगप्रमाणेच ग्राहक खाण्यापिण्यापासून ते कपड्यांपर्यंत ऑर्डर देतात त्याच प्रकारे शेती संबंधीत उत्पादने ऑर्डर करु शकतील

हेही वाचा: भारतासह जगभरात इन्स्टाग्राम डाउन; वापरकर्त्यांची सोशल मिडियावर तक्रार

पेमेंट ऑप्शन्स

शेती बियाण्यांसह अनेक प्रकारचे सामान किसान स्टोरमध्ये इतर ठिकाणांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होईल असा दाव Amazon कंपनीने केला आहे . या सुविधेचा होम डिलिव्हरी तसेच, डेबिट आणि क्रेडिट कार्डसह नेट बँकिंग, यूपीआय, Amazon पे सारखे सोपे पेमेंट पर्याय उपलब्ध असतील. अमेझॉन किसान स्टोअर पाच भारतीय भाषांमध्ये देण्यात येणार आहे. यामध्ये हिंदी, तेलगू, कन्नड, तामिळ आणि मल्याळम या भाषांचा समावेश आहे. देशभरातील 50,000 हून अधिक अमेझॉन इझी स्टोर्सला भेट देऊन शेतकरी शेती संबंधीत साहित्य खरेदी करू शकतील.

हेही वाचा: दसरा-दिवाळीसाठी आताच करा कारची बुकींग, अन्यथा ५ महिने पाहावी लागेल वाट

loading image
go to top